पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ [ लेखांक २३५ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी • येथील कुशल तागाईत श्रावण बहुल दशमी इंदुवासरपर्यंत स्वामींच्या • आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं खंडोजी साळवी याजबराबर आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. तेथें आज्ञा कीं, राजश्री पंतप्रधान यांजकडील श्रीचा वर्षासनाचा ऐवज सालमज- कुरचा एकसष्टरों रुपये पाठवून देणें हाणून. त्याजवरून श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांजकडील सालमजकूर सन ईसन्ने आर्बेन मया अलफचे वर्षा- सनाचे रुपये ६१०० एकसष्टरों थैल्या भरून लाखोटे करून खंडोजी साळवी याबराबर ओझ्यास माणसें देऊन सेवेसी पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांस लिहिलें पा- हिजे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. [ लेखांक २३६] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- - - . चरणरज अंबाजी त्रिंबक कृतानेक सा० नमस्कार विनंति उपरी स्वामींच्या आशीर्वादेंकरून ता० चैत्र बहुल अष्टमी रविवासरपर्यंत कुशल असो विशेष आजि दीड प्रहर दिवस आला ते समयीं राजश्री कृष्णाजी दाभाडे यांणीं राजश्री स्वामींस वर्तमान विदित केलें कीं, राजश्री पंतप्रधान यांचें व राजश्री त्रिंबकराव दाभाडे सेनापति यांचें युद्ध चैत्र शुद्ध पक्षीं झालें. सेनापतीची फौज मोडिली. खासा राजश्री ३ ४ हें डभोई येथील युद्ध होय. लेखांक २६ पहा. १ श्रावण बहुल दशमी इंदुवासरः - ता० २४ आगस्ट ३० स० १७४१. २ इसन्ने ऑर्बेन: – ३० स० १७४१४२. - चैत्र बहुल अष्टमी रविवासरः - ता० १८ एप्रिल इ० स० १७३१.