पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२५ कुशल असो विशेष तीर्थरूप राजश्री पंतप्रधानस्वामींचें विनंतिपत्र स्वामींस आलें तें जासुदासमागमें सेवेसी पाठविलें आहे. त्यावरून स विस्तर विदित होईल. येथील वर्तमान तरी राजश्री उदाजी चव्हाण राजश्री स्वामींस छ० १८ मोहरम येऊन भेटले. बोलीचालीचा नि- श्चय कांहीं हा कालपर्यंत झाला नाहीं. सेवेसी कळावें यास्तव लिहिलें आहे. सदैव आशीर्वादपत्र सांभाळ केला पाहिजे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. ● [ लेखांक २३४] श्री. - व श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागाईत छ ७ सफेर रविवार प्रातःकाळ मुक्काम रेठरें स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वा दपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन परमानंद जाहला. ताम्राचें व राजश्री प्रधानपंताकडील वर्तमान कळत नाहीं, तर लिहून पाठवणें, ह्मणून आज्ञा. ऐशास निजामन्मुलुक यांणीं सुनकें रान पाहून बितिंगागड आं- वढ्याजवळ होता, त्यास मोर्चे लावून सत्तावीस दिवस गड झुंजला; शेवटीं घेतला. आणिक दुष्ट बुद्धि धरून कावनई किल्ल्यास मोर्चे लावावया फौज रवाना केली ह्मणून वर्तमान आले आहे. निजामन्मुलुक नाशका- समीप देवळालीवर आहे. याउपरी कोणीकडे जाईल तें पाहावें. तीर्थरूप राजश्री नाना बुंदेलखंडांत गेलियापासून आह्मांकडे कांहीं कागदपत्र आला नाहीं. सेवेसी विदित झाले पाहिजे. राजश्री स्वामींचें आज येथून कूच होऊन तडसरावर गेले. याउपरी देवदर्शनास जेजुरीस चालिले. स्वामींस कळावें यास्तव लिहिले आहे. स्वामींनीं श्रीचा प्रसाद पंचवीस केळें पाठविलीं तीं प्रविष्ट जाहलीं विदित झाले पाहिजे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. १ छ ७ सफर रविवारः - ता० ५ एप्रिल इ० स० १७४१. -- १५