पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ गुजर याचे पदरीं बाळकोजी पांडा याचे गुजारतीनें घातले असेत. सदरहू ऐवज स्वामींनीं अंताजी तळेकर जामदार याजपाशीं सोळा हजार सवात्र्याऐशीं रुपये पोता ठेविले. त्यापैकीं पांच हजार रुपये सद- रहू देविले ते दिले असेत. सेवेसी विज्ञापना. [ लेखांक २३२] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसीः— चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागाईत छ १८ रमजानपर्यंत स्वामींच्या आशीर्वादें- करून यथास्थित असे विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र कृपाळूपणें पाठविलें तें पावलें, लेखनार्थश्रवणें आनंदावाप्ति जाहली. राजश्री सयाजी कनोजे याविशीं आज्ञापिलें तर पूर्वील आज्ञेनें पुण्यास तीर्थरूप राजश्री नानांस लिहून पाठविले होतें त्याचें उत्तर कालच सायंकाळीं आलें तं वर्तमान सेवेशी लिहून पाठविणार तो स्वामींचेंही आशी- र्वादपत्र आले. त्याजवरून तीर्थरूप राजश्री नानांचें उत्तर सेवकास आले त्याची नक्कल करून सेवेसी पाठविली आहे. त्याजवरून विदित होईल. तर स्वामींनीं सयाबास पुण्यास जावयाची आज्ञा करून आपलें पत्र देऊन पुण्यास रवाना करावें. पांचशे रुपये सालिना पावते करि- तील व दोन वस्त्रे देऊन समाधानपूर्वक चालवितील. स्वामींचे आज्ञेपेक्षां अधिकोत्तर काय आहे? सर्व स्वामींच्या आशीर्वादाचें आहे. विदित झाले पाहिजे. स्वामींनीं प्रसाद दाळिंब पक्क पाठविलें तें पावलें. उत्तम फळ आहे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. श्री. - [लेखांक २३३] श्रीमत् महाराजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना ता- गाईत छ २२ मोहरम मुक्काम भिलवडी स्वामींच्या आशीर्वादेंकरून