पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२३ यथास्थित असे विशेष. स्वामींनी आशीर्वादपत्र कृपाळू होऊन पाठविलें तें आजच पावलें तीर्थरूप राजश्री नाना व राजश्री सदोबाकडील वर्त मान ल्याहावयाविशीं आज्ञापिलें, तर तीर्थरूप राजश्री नानांचीं पत्रे छे १ जिल्हेजचीं जगमनपूर कालिंदीतीर येथील मुकामीचीं छ १३ मो- हरमीं आलीं. तेथें लिहिले आहे की, प्रयागीं श्री गंगास्नान करून माघारें फिरणें होईल. पटण्याकडून स्वारी करून येऊं ऐसें लिहिलें आहे. सांप्रत वर्तमान कळत नाहीं. कोणे स्थळ आहेत, कोठपावेतों गेले, तें लिहून येईल तेव्हां सेवेसी लिहून पाठवूं. पहिले वर्तमान आ तें सेवेसी लिहिले आहे. तीर्थरूप राजश्री सदाशिवपंत भाऊ श्री गो- दास्नान श्री त्र्यंबक करून हुताशनीकारणे पुण्यास येणार होते. ते पुण्यास येऊन दाखल झाले कीं कोणे ठिकाण आहेत हें सांप्रत कांहीं त्यांचें लिहिलें आलें नाहीं. सेवेसी वर्तमान कळावें यास्तव लिहिलें आहे. विदित झाले पाहिजे. राजश्री सदाशिवपंत हुताशनीकारणें पुण्यास आले. सेवेसी कळावें. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. श्री. [ लेखांक २३१ ] श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- . चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल तागाईत छ १५ जिल्हेजपर्यंत स्वामी आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामींनीं बाळकोजी पांडा याजबरोबर आ शीर्वादपत्र पाठविलें तें पावलें स्वामींची आशा की आपला ऐवज पोता आहे, त्यापैकी कर्ज राजश्री रामाजी नाईक कानडे वस्ती पुणे मार्फत त्रिकम शेट गोविंदजी यांस रुपये पांच हजार देणें ह्मणून आशा त्याजवरून रुपये ५००० पांच हजार त्रिकम शेट गोविंदजी - १ छ. १ जिल्हेज:-ता. १७ जानेवारी इ. स. १७४३ सोमवार. २ जगमनपूर:- हे यमुनेच्या कांठीं जालवण जिल्ह्यांत एक गांव आहे.