पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ आले असेल तर ल्याहावयासी आज्ञा केली, तर तीर्थरूप राजश्री नानांचीं पत्रे छ ३ सवालचीं कासारबारी पलीकडून पिंपरखेडचे मुक्कामीहून आलीं होतीं. तेथें लिहिलें कीं राजश्री बाबुराव मल्हार नबाब निजा- मन्मुलुक यांजकडे पाठविले आहेत. आपणही जामनेर वरणगांवचे रोखे जाणार. फौज जमा झाली. आणखीही वरचेवर जमा होतच आहे. ह्मणून लिहिले आहे. स्वामींस कळावें यास्तव लिहिले आहे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. [लेखांक २२९] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागाईत छे १४ रबिलाखर सौम्यवासरपर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष. सोमाजी घाणेकर भेटला. त्याणें सांगितले की, परवांचे दिवशीं श्रीचें आगमन धावडशीस झाले झणून ऐकोन परमानंद झाला. विदित व्हावें. राजश्री स्वामींनीं आ झांस आग्रहेकरून पालखींत बसावयाची आज्ञा केली. त्याजवरून आषाढ शुद्ध त्रयोदशी इंदुवारीं पालखींत बसावयाचा मुहूर्त केला. सर्व फळादेश स्वामींच्या आशीर्वादाचा आहे. सेवेसी कळावें यास्तव लिहिले आहे. विदित झाले पाहिजे. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. [ लेखांक २३० ] श्री. - श्रीमंत महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल फाल्गुन बैहुल षष्ठीपर्यंत स्वामींच्या आशीर्वादेंकरून १ छ० १४ रविलाखर सौम्यवासरः - ता. १७ जून इ.स. १७४१ बुधवार २ आषाढ शुद्ध त्रयोदशी:-ता. १५ जून इ. स. १७४१, सोमबार ३ फाल्गुन बहुल पछी: - ता० ५ मार्च इ. स. १७४३.