पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२१ काम झालें. पाणी उत्तम आहे. महाराजांनीं बहुत उत्तम गोष्ट केली. मार्गावर विहीर, बहुत लोक मार्गानें येतात, महाराजांची कीर्ति वर्णितात. सेवेसी श्रुत होय विज्ञापना सौभाग्यादिसंपन्न वज्रचूडेमंडित विरूबाई साहेब यांचे पत्र पुणियास स्वामींनी पाठविलें होतें तें पत्र माघारें आलें. तें सेवेसी पाठविलें असे. विज्ञापना. [ लेखांक २२७] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल तागाईत छ १६ सफर पावेतों स्वामींच्या आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. तीर्थरूप राजश्री आपा स्वामींनीं वसई फत्ते केली. त्यांची पत्रे स्वामींस आलीं तीं स्वामींकडे रवाना केलीं आ- हेत. त्यांजवरून सेवेसी निवेदन होईल. सेवेसी श्रुत होय विज्ञापना. [ लेखांक २२८ ] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागाईत छे १६ सवाल गुरुवारपर्यंत स्वामींच्या आ शीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं दोन आशीर्वादपत्रे सोमाजी घाणेकराबरोबर पाठविलीं तीं प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणें आनंदावाप्ति झाली. तीर्थरूप राजश्री नानांकडील वर्तमान फत्तेचें - - १ छ० १६ सफर:- ता. १४ मे इ. स. १७३९ सोमवार वसईहून चि माजी आपांनीं स्वामींच्या नांवचीं जीं पत्र पाठविलीं तीं प्रथम दादोबाकडे पुण्यास पाठविलीं होतीं त्याप्रमाणे तीं त्यांनी स्वामींकडे रवाना केली असें ह्या पत्रावरून व्यक्त होतें. २६० १६ सवाल गुरुवारः - ता. २३ जानेवारी इ. स. १७४१. मोड- कांच्या जंत्रीमध्ये ह्या तारखेस शुक्रवार दिला आहे. तथापि हें पत्र ह्याच सालां- तील आहे ह्यांत शंका नाहीं.