पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ असह्य होऊन व त्यांत स्वामींनी आपली मानखंडणा केली असे वाटून, त्यानें स्वामींस अप्रत्यक्ष रीतीनें उपसर्ग देण्याचा क्रम आरंभिला. शामल दुष्टबुद्धि, बेइमान हें चित्तांत आणून व आतां परशुराम आपला निभाव लागणे कठीण आहे असे पाहून, स्वामीनीं शाहु महाराजांची भेट घेण्याकरितां व धावडशी येथील व्यवस्था पाहण्याकरितां महाराष्ट्रांत गमन करण्याचा संकल्प केला. वर दिलेली हत्तीच्या भांडणाची हकीकत स्वामींची बहुतेक कारकीर्द प्रत्यक्ष पाहिलेले त्यांचे कारकून जगन्नाथ चिमणाजी भागवत ह्यांनीं स्वतः लिहिलेल्या बखरीच्या आधाराने लिहिली आहे. ही सर्व खरी असून ह्यासंबंधाचीं पत्रही आह्मांस धावडशी संस्थानच्या दप्तरांत सांपडली आहेत. हत्तीच्या कारणावरून सिद्दी सात ह्यानें श्री परशुराम येथील देवालयाचा माघ वद्य चतुर्दशीस ह्मणजे शिवरात्रीचे दिवशीं विध्वंस केला. ह्या मित्तीच्या अगोदर सिद्दी सात त्यानें हत्तीबद्दल दस्तक देण्याविषयीं विशाळगड येथील प्रतिनिधीस लिहिलेले पत्र आह्मांस उपलब्ध झाले आहे. ते येणेप्रमाणे:- “पंडित अजम अकरम गंगाधर कृष्ण दाम मोहबत हु - ● @ मोहिवान पन्हा मुखलिसान दस्तगाह अजी दिल एखलास सिद्दी सात सुभेदार सलाम बादज सलाम खैर अंज्याम सुहुर सन सबा इशरीन मिया व अलफ, अंकीं येथील खैरसल्ला जाणवून मोहिन आपली खैरसल्लीं कलमीं मरकूम करीत असिलें पाहिजे. दिगर मोहिवीं किताबत छ० ९ रविलावलची मरसूल केली ते नेकसात वारीद होऊन खुषवख्ती विशियार जाहली. सावनूर बं कापुराहून हत्ती व तहयेफे यावयाचा ऐसे. त्याचे दस्तकाबाबें व तिकडून आ- रामशीर येऊन पोहोंचावयाचे बाबें दोस्तीचे जागां मोहिबास कलमीं केलें होतें. त्याचा जबाब कलमीं केला कीं, “फिलबाल पनाळेयाचें दस्तक पाठविलें असे. पंडित अजम कृष्णाजी परशुराम प्रतिनिधि महाराजे यांचे मलाजमतेस गेले असत. तेथून महाराजे यांचेंही दस्तक व बाजेसरदारांचीं दस्तकें पाठवितील. मोहिबीं हत्ती आणावयास लोक रवाना करावयाचे ते केले पाहिजेत. येथे आल्यावर त्याजबराबर मुद्दाम माणसें देऊन रवानगी करून हत्ती आणवून रवाना करूं.” ह्मणून कलमें केलें. तर येकिन आहे कीं दुतर्फा दोहीं ज्यादा दोस्तीचा तरीका चालत आहे तेथें हैं कामसें काय आहे? आणखीही कितेक