पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० आपण आशीर्वादपत्र खंडोजीहस्तें पाठविलें तें उत्तम समयीं प्रविष्ट हो- ऊन लिहिले अवगत जालें. आज्ञा जे, बैलाचें दस्तक साल मजकुरचे पाठविणें ह्मणून. त्यावरून दस्तक खंडोजी इस्तें सेवेसी पाठविलें आहे. त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. १८ पुरंदरे. श्री. [लेखांक २२६] श्रीमत् महाराज राजश्री परमहंस बावा स्वामींचे सेवेसी:- चरणरज मल्हार तुकदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरी स्वामींच्या आशीर्वादेंकरून तागाईत श्रावण शुद्ध चतुर्थी भृगुवासरप- र्यंत कुशल असो विशेष. राजश्री स्वामींनीं मजला फलटणास पाठविले होतें त्यास काल गुरुवारी सायंकाळी सातारियास आलों. श्रीमंत रा जश्री पंतप्रधान यांनी महाराजांस पत्र पाठविले ते सेवेसी पाठविलें आहे. त्यावरून विदित होईल. पोताहून ऐवज स्वामींकडे देविला. - रुपये: – १५०० बाबत ह्ताले तळें. पूर्वील संकल्प रुपये ३५०० साडेतीन हजार पैकीं पावले रुपये २००० दोन हजार बाकी ५०० उसणें लिंबाजी सांवत सन सीत एकूण २०००. एकूण दोन हजार रुपये पोत्यास लाखोटे करून ठेविले. नदीस पाणी याकरितां पाठविले नाहींत. महाराजांनी आज्ञा केली तर पाठवून देऊं. सेवेसी श्रुत होय. फलटणास जातांना मार्गी विहीर पाहिली. उत्तम ● १ मल्हार तुकदेवः-यांचे उपनांव पुरंधरे. हे अंबाजीपंत पुरंधरे पेशव्यांचे मुतालीक ह्यांच्या वडील बंधूंचे पुत्र. हे दादोबा ह्या नांवानें प्रसिद्ध आहेत. हे पेशव्यांच्या वतीने शाहूच्या दरवारांत पुष्कळ वर्षे होते. त्यांचे चिरंजीव धोंडोपंत हे दिल्लीस वकील होते. घोंडो मल्हार यांचेकडून दिल्लीच्या राजकारणांची पेश- व्यांस पत्र येत असत. २ श्रावण शुद्ध ४ भृगुवासरः- ता. ११ जुलई इ. स. १७३५. -