पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१९ आशीर्वादें करून फाल्गुन शुद्ध त्रयोदशी वर्तमान कुशल असे विशेष. स्वामींनीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें, राजश्री पंताजी करिंदे (१) यानें अधिकाराविस कित्येक विषदें आज्ञा लिहिली, ऐसीयास सांप्रत उभयतां राजश्री स्वामींचीं दर्शनें परस्परें जालीं आहेत. कारभाराचा दंगा जा- हला आहे. यामध्ये धंद्याचा निकाल निघतो ऐसें नाहीं. अखेर सालों ये गोष्टीचा विचार राजश्री स्वामींस श्रुत करून काढूं. अखेर सालीं त्यास आह्नांकडे पाठवावें विदित जालें पाहिजे. कृपा वर्धमान केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. हे [ लेखांक २२४ ] श्री. -- महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- चरणरज नारो शंकर सचीव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. ताा० आषाढ शुद्ध चतुर्थी पावेतों स्वामींच्या आशीर्वादें येथील व र्तमान यथास्थित असे विशेष स्वामींनीं अंतोजी पाथरा याहस्तें पत्र पाठविलें तेथें पैक्याविशीं लिहिलें. ऐसीयास सांप्रत गैरहंगाम यामुळे बहुतसी ओढी जाली आहे. ते पत्रीं लिहितां पुरवत नाहीं. स्वामी रागास येतील याकरितां रु० २५ पंचवीस अंतोजीहस्तें पाठविले आहेत, ते घेतले पाहिजेत. वरकड राहिला ऐवज हंगामशीर कार्तिक मार्गेश्वरमास स्वामींस प्रविष्ट करूं. कृपा वर्धमान असों दिल्ही पाहिजे. हे विनंति ● . [ लेखांक २२५ ] श्री. महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक चिमणाजी नारायण सचीव विज्ञापना विशेष. येथील वर्तमान आश्विन वद्य ८ पर्यंत श्रीचे कृपेंकरून यथास्थित असे. यानंतर - १ चिमणाजी नारायणः - नारोशंकराचे दत्तक पुत्र कारकीर्द इ. स. १७३७ ते इ. स. १७५७.