पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ नाहीं. यंदाचे वर्षी आह्मांवर कसाला पडला तो आपल्यास विदित आहे. यामुळे चिरंजिवापासून अंतर पडिलें आहे. स्वामींनीं क्षमा करून दया केली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति. [ लेखांक २२२ ] ॥ श्री आई आदिपुरुष | - श्रीमत् परमहंस सच्चिदानंदकंदभृगुनंदनस्वरूपेभ्यां स्वामींचे सेवेसी- चरणरज शिवराम कृष्ण साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम ता० पौष शुद्ध प्रतिपदापर्यंत स्वामींच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींनीं बहुत दिवशीं स्मरणपुरस्सर आशीर्वादपत्र पाठ- विलें तें प्रविष्ट होऊन दर्शनातुल्य हर्ष जाहला. ऐसेंच सतत आशी- र्वादपत्र पाठवून परामर्ष करीजेत असले पाहिजे. यानंतर गांवचा अर्थ आज्ञापत्र लिहिला, ऐशास प्रस्तुत तीर्थस्वरूप रा० आणा सतंऋषींस तीर्थस्वरूप रा० राऊ स्वामींच्या दर्शनास गेले आहेत. त्यांचें आगमन स्वस्थळास जाहल्यानंतर येविषयींचा अर्थ निवेदन करून सेवेसी विनंति- पत्र पाठविले जाईल. स्वामींनीं प्रसादयुक्त तिवट पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. आपले आशेपेक्षां विशेष काय आहे ? बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे हे विनंति. ● १७ सचीव. श्री. तीर्थरूप श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः- चरणरज नौरो शंकर सचीव साष्टांग नमस्कार विनंति स्वामींच्या [ लेखांक २२३ ] - १ शिवराम कृष्ण:- कृष्णाजी परशुराम यांचे चिरंजीव. २ सप्तऋषि:- सातारा. ३ नारो शंकर सचीव:- भोरचे पंतसचीव कारकीर्द प. स. १७०७ ते इ.स. १७३७.