पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१७ परामर्ष करीत गेलें पाहिजे. धावडशी, आनेवाडी, व इडमिडें ( वीरमाडे ) हे तीन्ही ग्राम श्रीचे. तेथें उपद्रव करून ऐवज घेतला हे गोष्ट अनुचित आहे. पैका माघारा श्रीस देवणें ह्मणून आज्ञा. तरी, श्रीचे ग्रामींचा पैका माधारा द्यावा हे गोष्ट यथार्थच; परंतु यंदा मुलकांत सर्वत्र वळवा पडला. येथें फौज ठेविली त्याची बेगमी जाली पाहिजे, याजकरितां सर्वत्र मुलकांत पट्टी केली. त्याप्रमाणे याही गांवावरी राजश्रींनीं पट्टी घालून वसूल घेऊन लष्करचे बेगमीस ऐवज देविला. तो आतां माघारा येतो ऐसा अर्थ नाहीं. बरें. जे जालें तें जालें स्वामींचे आज्ञेवरून ह्याउपरी तीन गांवांस उपद्रव लाग- णार नाहीं. रोखापत्रही होणार नाहीं. येविशीं राजश्रींनींही सेवेसी विज्ञप्ति लिहिली आहे. त्यावरून कळों येईल. स्वामींनीं समाधान असों दिल्हें पाहिजे. कृपा केली पाहिजे हे विज्ञति. [लेखांक २२१ ] ॥ श्री आई आदिपुरुष | श्रीमत् सकल तीर्थस्वरूप राजश्री स्वामी स्वामींचे सेवेसीः— विनंति सेवक कृष्णाजी परशुराम कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. सेवकाचें वर्तमान स्वामींच्या आशीर्वादें यथास्थित असे. यानंतर स्वा मींनी आशीर्वादपत्र पाठविलें तें पावलें. मौजे डोरलें व महालुंगे या दोनही गांवच्या रयता धरून नेल्या आहेत त्याविशीं स्वामींनीं आज्ञा केली. तरी स्वामींचे आज्ञेनुरूप आह्मांस दुसरें अवश्य काय आहे ? स्वामींचे आज्ञेप्रमाणें चिरंजीव रा० बाबूराऊ यास पत्र लेहून मुजरद् मनुष्य रवाना केले आहे. दोनी गांवचीं कुळें जे काय धरून नेलीं असतील ते सोडून देतील अंतर आहे ऐसें नाहीं. चिरं जीवासही स्वामींची आशा प्रमाण. आपले आज्ञेविरहित आह्मीं - १ कृष्णाजी परशुरामः-श्रीनिवासरावाचे वडील बंधू. हे कोल्हापूरचे प्रति- निधि व विशाळगड संस्थानचे मूळपुरुष होत.