पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ होऊन लेखनार्थ अवगत जाहला. मौजे वीरमाडें येथें पालखीपट्टी रुपये चाळीसांचा रोखा जाला आहे तो मना केला पाहिजे ह्मणून लिहिले, तरी आझांकडून रोखा जाहला नाहीं व पट्टीही केली नाहीं. राजश्रींनीं पालखीपट्टी केली आहे. त्यांची आज्ञा रा० मोरो जिवाजी यांस जाली आहे. हुजुरून रोखा केला तो आह्मांस रदबदल करितां कामास येत नाहीं. आझांकडून स्वामींच्या गांवांस कोणे- विसीं उपसर्ग लागत नाहीं. परभारें स्वामींनीं राजश्रींस लिहून पाठ- विलें पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विज्ञप्ति. [लेखांक २१९ ] सेवक श्रीनिवास ॥ श्री आई आदिपुरुष । श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- परशराम प्रतिनिधि नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत गेले पाहिजे. विशेष माहुली संगम श्री देवाचे इमारतीस बाटाचे खरेदीबद्दल आपाजी कासार याजकडे पैका दिला. त्याणें बाट बैल भरून पुढें रवाना केले, ते माहुलीस इमार- तीकडे कोठीस घेतले. ऐसें असतां आपाजी कासार यासी तुझीं नेऊन बसविला आहे ऐसें कळों आलें. तरी त्यास बसवावयास प्रयोजन काय आहे ? बाटांकरितां काम तटलें होतें, यास्तव जे बैल आले ते कोठीस माप घेतले. त्याचा अपराध नसतां बैसवावें ऐसें नाहीं. याउपरी त्यास सोडून देणें. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना. [ लेखांक २२० ] ॥ श्री आई आदिपुरुष | श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- - - चरणरज श्रीनिवास परशराम सा० नमस्कार विज्ञप्ति. येथील क्षेम ता० वैशाख शुद्ध चतुर्थी गुरुवासर स्वामींचे दर्येकरून क्षेम असो. यानंतर स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अभिप्राय कळों आला. ऐसेंच निरंतर आशीर्वादोक्त पत्र प्रेषून बालकाचा