पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१५ [ लेखांक २१६ ] ॥ श्री आई आदिपुरुष ॥ श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक श्रीनिवास परशराम चरणावरी मस्तक ठेवून वि ज्ञापना ता० चैत्र शुद्ध द्वितीयापर्यंत स्वामींचे कृपादृष्टीकरून यथा- स्थित असो विशेष स्वामींनीं आशीर्वाद खंडोजीहस्तें सांगोन पाठ- विला. आज्ञा केली कीं, नीरा नदीस पूल बांधणें इच्छा आहे. सेवेसी राजश्रींची आज्ञा घेऊन उत्तर पाठवावें ह्मणून. त्यास, कित्येक राजक्रां- तीचा मजकूर प्रस्तुत काळीं आला आहे, त्याजमुळे हा विचार न करावा ऐसें राजश्रींच्या चित्तास येतें. येविशीं कित्येक सांगणें तें खंडूजीस सांगितले आहे. विदित करील. त्याजवरून कळोन येईल. हे विज्ञापना. ● [ लेखांक २१७] ॥ श्री आई आदिपुरुष | श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक श्रीनिवास परशराम प्रतिनिधि कृतानेक विज्ञप्ति ये- थील कुशल जाणून स्वकीय लेखन केले पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. लिहिलें वर्तमान कळों आलें. पाथरवटाचा मजकूर लिहिला तरी येविसींचा विचार आपणाकडील कारकून सां- गतां विदित होईल. पांचरों रुपयांचा मजकूर लेख केला, त्यास चैत्रमास आह्मी आपल्या दर्शनास येऊं ते समयीं घडून येईल. हे विनंति. - - [लेखांक २१८ ] ॥ श्री आई आदिपुरुष ॥ श्रीमत् सकल तीर्थस्वरूप राजश्री बावा स्वामींचे सेवेसीः— अपत्यवत् श्रीनिवास परशराम प्रतिनिधि सा० नमस्कार विनंति उपरी येथील वर्तमान कार्तिक शुद्ध प्रतिपदा रविवारपर्यंत स्वामींचे दयेंकरून यथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखन करून संतोष- वित असले पाहिजे. विशेष स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट