पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ ● आणि “परशरामीं तुझीं ब्राह्मण दुसऱ्याचे बोलें ठेविला; तो नानाप्रकारचीं कर्मों करितो. आपले चित्तीं भांडारगृह बांधावें, आणखी इमारत श्रीची चालवावी हा हेतु होता. त्यास, तो तेथें राहून अधिपति जाहला असतां आपण काय करणें" ? ह्मणून कित्येक विषादें लिहिली, तरी आह्नीं त्या ब्राह्मणास कांहीं तेथें ठेविला नाहीं. अथवा आह्मांस कोणीं सांगितलेंही नाहीं. आझांस त्याचें अगत्य आहे ऐसें नाहीं. आपल्यापेक्षां आझांस तो अधिक काय आहे ? आपण त्यास लावून द्यावें. त्याचा कांहीं आह्मांस दुराग्रह सर्वथा नाहीं. आपण नाहक आमचा संशय धरून चित्तांत वि- पर्यास आणावासा नाहीं. आमचे चित्तीं तिळतुल्य नाहीं. छ. १२ रबिलावल. आह्मी कांहीं कजियांत नाहीं. तुझी आणि तो जाणे. आंग- रीयानें त्याची हिमात केली तरी आम्ही काय करावें? आंगन्या आमच्या हुकुमांत आहे ऐसें नाहीं. आपण समर्थ आहां. जे चित्तास येईल तें करावें. हे विज्ञापना. [लेखांक २१५] ॥ श्री आई आदिपुरुष | - सकल तीर्थस्वरूप राजश्री परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यवत् श्रीनिवास परशराम प्रतिनिधि सा० नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता० छ० १० जमादिलावलपर्यंत स्वामींचे आशीर्वादिकरून मुखरूप असों विशेष. आपण आशीर्वादपत्र पाठ विलें तें प्रविष्ट होऊन मस्तकीं वंदून संतोष जाहला. श्रीचा प्रसाद श्रीफल पाठविलें तें प्रविष्ट जाइलें. श्रीकडे गांव इनाम सहा आ हेत. त्यांच्या सनदा द्याव्या झणजे श्री कार्यसिद्धि करील ह्मणून लि- दिलें, त्यावरून सनदा दिल्ह्या आहेत. याउपरी सत्वर कार्य- सिद्धि होय तें स्वामींनीं केले पाहिजे. श्रीस वस्त्र आठ पाठविलीं आहेत, र्ती श्रीस लावावीं ह्मणोन लिहिलें, तरी स्वामींचे आज्ञे- प्रमाणें वस्त्रें प्रविष्ट होतांच श्रीस लाविलीं. विदित जालें पाहिजे. कृपा केली पाहिजे, हे विज्ञापना.