पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१३ कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष स्वामींनी सेव- कावरी कृपादृष्टि करून आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन बहुत संतोष जाहला. आणि आपण भेटीस येणें ह्मणून आज्ञा केली. त्यास दर्शनास यावें हें आमचे चित्तांत आहे. परंतु तीर्थस्वरूप राजश्री कुत्ररजी बावांस शरीरास सावकाश वाटत नाहीं. याजकरितां प्रस्तुत यावयाची अनुकू- लता होत नाहीं. तीर्थरूपास शरीरास समाधान जाहलीयावरी स्वामींचे दर्शनाचा लाभ घेतला जाईल. स्वामींचें देणे रुपये चारशें त्यापैकीं तूर्त आपणाकडील रुपये २०० दोनशें भिकाजी संखपाळ याजबरोबर पाठ- विले आहेत. बाकी राहिले तेही तरतूद करून लवकरीच प्रविष्ट करितों. कळले पाहिजे. स्वामींनीं इतका प्रसंग पूर्वी विषादेंकरून ल्याहावा ऐसा अर्थ नव्हता. परंतु वडिलांनी आशीर्वादपत्र पाठविले त्यावरून समाधान जाहलें. बाकी ऐवज लवकरीच पोहोंचेल. बहुत काय लिहिणे, लोभ अस दीजे हे विनंति. १६ प्रतिनिधि [ लेखांक २१४ ] ॥ श्री आई आदिपुरुष * ॥ श्रीमत् परमहंस राजश्री बावा स्वामींचे सेवेसीः– सेवक श्रीनिवास परशराम प्रतिनिधि कृतानेक नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असले पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. कित्येक पूर्वील कथा लिहिली

  • “श्री आई आदिपुरुष" हें प्रतिनिधींच्या प्रत्येक पत्राच्या शिरोभागी लिहिलेलें

असतें. ह्याचे कारण हे मुळचे औध ता० कोरेगांव येथील राहणारे असून तेथील देवीचे भक्त होते. त्यामुळे त्यांचें कुलदैवत तेथील देवी हे आहे. त्याचेंच दर्शक “ श्री आई आदिपुरुष " असें पत्रावर लिहिण्याचा सांप्रदाय आहे. १ श्रीनिवास परशरामः- परशराम त्रिंबकाचे दुसरे चिरंजीव व दुसरे प्रतिनिधि, ह्यांस श्रीपतराव अर्सेही ह्मणत. कारकीर्द ह. स. १७१८- इ. स. १७४६.