पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ १५ शिर्के. श्री. [ लेखांक २१२] . श्रीमत् तपोनिधि परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः— सेवक कानोजीराजे शिर्के कृतानेक साष्टांग दंडवत विज्ञापना. स्वामींनीं पत्र पाठविलें तें पावोन परम समाधान जाहलें ऐसीया आपण लिहिलें कीं, “शिर्के झणजे राजे. तुझांस अभिमान निःसीम असावी. तुझांस जो आह्नीं बीजमंत्र सांगितला आहे जे, आपाजी आं- गरे व तुझी एकहातें होऊन सौभाग्यवती बाईजवळ बोली करून कार्य करणें, ह्मणजे तुमचें कार्य फळास येईल. खर्चावेंचाचें संकट बाईस न घालणें. बाईजवळ पैका मागता, तेणेंकरून तीस संकट पडोन कामाची पायमल्ली होते" ह्मणून लिहिले, त्यास आली तेथें आलों तेव्हां स्वामींनीं आझांस जे सांगणें तें सांगितले. त्यावरून छत्र- पति स्वामींपार्शी चार गोष्टी बोलणें ते बोलिलो. त्यावरून त्यांणीं आज्ञा केली कीं तुझी जे बोलणें तें वाडीयामध्ये बोला. त्यास आझी वाडीयामध्ये जाऊन सौभाग्यवती बाईजवळ बोलों लागलों तो आ- मच्या गोष्टी त्यांच्या चित्तास न ये. त्यावरून त्यांचा आमचा बनाव बसेना. ऐसीयास आमचें मन उदास जाहले. त्यावरून आझी नि- घोन (फाटले आहे ) असतें. तरी या पत्राचें उत्तर सत्वर पाठवणे. सविस्तर वर्तमान राजश्री बाळाजी हरी मुखजबानीं सांगतां कळों येईल. बहुत काय लिहिणें, कृपालोभ करीत असिलें पाहिजे. सेवेसी हे विज्ञापना. - [ लेखांक २१३] श्री. - हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री बाबा स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक जैसिंगराजे शिर्के दोनी कर जोडून चरणावरी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग दंडवत विनंति उपरी येथील क्षेम जाणून स्वकीय