पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२११ १४ सोमवंशी. श्री. [ लेखांक २१० ] तीर्थस्वरूप चैतन्यरूप परमहंस स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक दावलजीराव सोमवंशी सरलष्कर दंडवत. विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन आज्ञा केली पा- हिजे. विशेष स्वामींनीं पत्र पाठविलें तें मस्तकीं वंदिलें तेथें आज्ञा कीं, श्रीचे आह्नांकडील पांचरों रुपये व राजश्री निंबाजीबावाकडील रुपये दोनशें, ऐसीयास आझांकडील रुपये पांचरों पैकीं राजश्री जिवा- जीपंत कारकून याजबराबरी रुपये २७५ पावणे तीनशें पाठविले असती. बाकी रुपये सवादोनशे राजश्री सखो महादेव सरसुभेदार यांजकडे ऐवज देविला आहे. तो ऐवज स्वामींस सत्वरींच प्रविष्ट करितील. स्वामींस वस्त्र शेला शुभ्र पाठविला आहे. घेतला पाहिजे सदैव सेवकावरी दया करून सेवकाचें अभीष्ट होय तें केलेंपाहिजे. आझी सर्वस्खें स्वामींचे आहों. आह्मांस महदाश्रय स्वामींचा आहे. तेथें फार ल्याहावें ऐसें नाहीं. सेवेसी श्रत होय हे विज्ञापना. [लेखांक २११ ] श्री. श्रीमत् परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- - सेवक हैबतराव सोमवंशी चरणावर मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति. येथील क्षेम पौष वद्य दशमी स्वामींच्या आशीर्वादें यथास्थित जाणून स्वकुशललेखन आज्ञा केली पाहिजे. विशेषः - श्रीचे रुपये शंभर पाठवावे झणून आशीर्वादपत्रीं आशा केली तरी सत्वरच सप्तऋषींस येणें आहे. तदोत्तर दर्शनास येऊन प्रविष्ट करूं. निरंतर आशीर्वादपत्रीं सेवकावर कृपावृद्धि करावी. संक्रमणाचे तीळ युक्त शर्करा पाठविली ते पावली. हे विज्ञापना. . - -