पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ हा शोचनीय देखावा अवलोकन करितांच स्वामींच्या अंतःकरणांत अनिवार दुःखवेग उत्पन्न होऊन, ते झालेला वृत्तांत कळविण्याकरितां दंडाराजपुरीस सिद्दी याकूदखान ह्याजकडे गेले आणि तेथें बहुत क्रोधयुक्त शापोक्ति बदले. सिद्दी याकूदखान स्वामींचा भक्त असल्यामुळे त्यास सिद्दी सात ह्याची वर्तणूक नापसंत होऊन, त्यानें स्वामींस विनंति केली कीं, “मजला न विचा रितां हैं कृत्य सिद्दी सात ह्यानें केलें. त्याचें पारिपत्य करितों. जे नेलें असेल तें माघारें देववितों स्वामींनीं स्वस्थ चित्त करावें. गुन्हा माफ करावा." ह्यावर स्वामी बोलिले कीं, “तुह्मी हबसी लोक, बेइमान, अविचारी तुमचे राज्यांत राहणार नाहीं. अतःपर तुमचें कल्याण नाहीं." ह्याप्रमाणें स्वामींचें भाषण ऐकून खान यानें सिद्दी सात ह्यास मोठ्या जरबेनें असें पत्र लिहिलें कीं, “मुला-गो-फकीर लोक यांचे बहुत प्रकारें आह्मी चालवीत आलों. पुढेही ज्यादा चालवणे आवश्यक असतां, त्यांचे दरगियास स्वारी पाठवून, तसनस करून चीजवस्त नेली याचे कारण काय ? उपरी देखतपत्र यांची परशुराम- हून चीजवस्त, जराबाजरा सुतळीचा तोडा आदिकरून, झाडून माघारी देऊन, पावती घेऊन हुजूर पाठविणें दिकत करून दिसगत केलियासी तुझा बळजा होणार नाहीं. तंगकरी देऊन पारिपत्य होईल." असें पत्र जातांच सिद्दी सात ह्यानें झाडून सर्व चीजवस्त परशुराम पाठवून दिली, आणि स्वामींनीं देवा- करितां रत्नजडित हिन्यांचीं तीन मूल्यवान् पदकें केली होतीं तीं मात्र खाना- कडे पाठवून दिली. खानांनीं तीं स्वामींपुढे ठेविलीं. परंतु देवाचीं पदकें यवनाने आपल्या उपभोगार्थ नेलीं, तीं देवाच्या उपयोगाचीं नाहींत, असे सांगून स्वामींनीं तीं खानास व त्याच्या पुत्रास बक्षीस दिलीं ह्या पदकांची किंमत पंचवीस हजार रुपये होती. ह्याप्रमाणें स्वामींनीं सिद्दी सात ह्याची खोड मोडून व देवाची बहुतेक चीजवस्त पुनः परत घेऊन याकूदखान ह्याचा निरोप घेतला. त्याने झालेल्या अपराधाबद्दल स्वामींची विनयपूर्वक क्षमा मागितली व त्यांस परशुराम येथील आपले स्थान सोडून जाऊं नये ह्मणून आग्रह पूर्वक विनंति केली. , + स्वामी श्री परशुरामास आले, व तेथें पूर्ववत् देवस्थानची यथासांग स्थापना करूं लागले. परंतु सिद्दी सात ह्यास दंडाराजपुरी येथे झालेला प्रकार