पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० ऐसेंच निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ करावा. ते पत्रीं कुणबिणीचा मजकूर लिहिला, ऐशास आपण स्वामींच्या दर्शनास येतों. समागमें घे ऊन येऊं. त्वरित येतों. कितेक अर्थ राजश्रींनीं लिहिला. प्रविष्ट होईल. विशेष काय लिहिणें, कृपा निरंतर असों दीजे हे विनंति . स्वामी कुलाबीयासी जाणार असत असें विदित जालें, ऐशास ते प्रांती मोत्यें व पोवळीं उत्तम असत. आपणास कृपा करून घेऊन आलें पाहिजे. हे विनंति. ● स्वामीकारणें खडावांचा जोड १ एक पाठविला आहे. त्याचा अं- गीकार केला पाहिजे. आपण दीपवाळीकारणें दर्शनास येऊं. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणे हे विनंति. १३ सूर्यवंशी. श्री. [लेखांक २०९] श्रीमत् सकल तीर्थस्वरूप राजश्री श्रीगुरु स्वामी स्वामींचे सेवेसीः– विनंति सेवेसी आशाधारक सुभानजी नाईक सूर्यवंशी कृतानेक वि ज्ञापना. येथील क्षेम तागाईत छ २७ सफरपावेतों वर्तमान यथास्थित असे. यानंतर कृपा करून पत्र पाठविले तें पावलें. तेथें आज्ञा जे, प्रांत शिराळे येथें देशचौगुलकीचा उपद्रव होतो, तेथें रोंखा पोखा न करणें ह्मणून आज्ञा. त्यासी वतनदारी पेशा आहे, याकरितां वतनदारीच्या नात्यानें रोंखा करावा लागतो. त्यास त्याचा ऐवज एखादे जागां स्वामींनीं एखादीयास देविला तरी देऊं. परंतु वतनी पेशा मना न करावी. ता- कीद करून वतनी हक्कदक्क जो होईल तो व इनाम देविला पाहिजे. आह्मी कांहीं स्वामींचे पायाशीं xxxतार्थ नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. -