पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०९ १२ थोरात. श्री. [ लेखांक २०७] - तीर्थस्वरूप महाराज राजश्री बावा स्वामी वडिलांचे सेवेसी:- अपत्यानुरूप बालकें सुभानजीराऊ व राऊजीराऊ थोरात चरणावर मस्तक ठेऊन साष्टांग दंडवत विज्ञप्ति ऐसीजे:- कृपा करून आज्ञापत्र पाठविलें, उत्तम समयाचे ठायीं प्रविष्ट होऊन अर्थ पूर्णावगत होऊन सनाथ जालों. “ यंदा समाधीस कृष्णातीरीं बैसलों प्रस्तुत श्रीकृप- करून धावडशीस आलों. शरीर बहुत कृश जालें. अवस्था कठीण गेली. " ह्मणून कितेक प्रकारें लोभललिगतेंकरून आशीर्वादपत्रीं सेवकजनास लिहिलें, कळों आलें. कितेक अर्थ निंबाजी फाळका यानें निवेदन केले. त्याजवरून संतोष पावलों तो महिमा पत्रीं लिहितां विस्तार होतो. ऐ- सेंच सदोदित आशीर्वादपत्रीं सांभाळ करावयासी समर्थ (आहां ). कुण- त्रिणीची पत्र आज्ञा सादर केली. अवश्यक चिरंजीव मुलें स्वामींचे दर्शनास येणार असत. त्वरीतच येतील. त्यांजसमवेत निसंदेहेंकरून सेवेसी पाठविली जाईल. निंबाजीबराबर श्रीचा प्रसाद नारळें वगैरे बा गांत लावयाचीं पाठविलीं तीं प्रविष्ट जालीं. सेवेसी विशेष लिहिणें काय ? कृपा निरंतर असों दीजे हे विनंति स्वामींस उदाजी पोवार यांनी बं दूख दिल्ही ह्मणोन ऐकिलें तरी स्वामींनीं आह्मांस खेळावयास पाठविली पाहिजे. चिरंजीव मानसिंग यास गारभाडें (?) कुलाबीयांतून आणविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें हे विनंति. ● . - - [ लेखांक २०८ ] श्री. - तीर्थस्वरूप महाराज राजश्री बावा स्वामी वडिलांचे सेवेसी :- अपत्यासमान बालकें सौभाग्यवती वज्रचूडेमंडित राधूबाई थोरात कृतानेक दंडवत. विज्ञप्ति ऐसीजे: स्वामींनीं कृपावंत होऊन राजश्रीस आशीर्वादपत्र पाठविलें, उत्तम समयीं प्रविष्ट होऊन अर्थ कळों आला. १४