पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ मोजे मजकूर कुलबाब कुलकानू हल्लींपट्टी व पेस्तरपट्टीव इनामपट्टी खेरीज इनामदार करून गांव दिला असे. तरी स्वामींनीं मौजे मजकु रचा ऐवज घेऊन माझें कल्याण इच्छिले पाहिजे, स्वामी ऊर्जित क रणार समर्थ असेत. इनामपत्र धारादत्त स्वामींस गांव दिला हे विज्ञा- पना सु || खमस आर्बेन मया व आलफ. तेरीखं ८ माहे जिल्काद शके १६६६ रक्ताक्षीनाम संवत्सर मार्ग- शीर्ष शुद्ध नवमी रविवार. मु० शाहुनगर. ११ ढमढेरे. श्री. [ लेखांक २०६] - भगवान् स्वरूप महाराज परमहंसबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति आज्ञाधारक जानोजी ढमढेरे साष्टांग दंडवत. विनंति उ परी:-स्वामींनीं कृपा करून सांभाळपत्र पाठविलें तें मस्तकीं वंदून तोषातें पावोन लेखनार्थ अवगत होऊन परम तोषातें पावलों. ऐसेंच निरंतर आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करीत असिले पाहिजे. यानंतर स्वामींनीं आज्ञा केली त्यावरून आपण दर्शनास यावयास सिद्ध जालों, तो श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचे पत्र आलें. याजकरितां जरूर जाणोन आपण पुण्यास स्वार होऊन गेलों. तेथें भेट जालीयावर आपण स्वामींच्या दर्शनास येऊं. स्वामींनी सवाशां रुपयांचें लिहिलें, तर आपण स्वा- मींच्या वचनाव्यतिरिक्त काय आहे ? स्वामींची आज्ञा आपणास मान्य आहे. चिरंजीव सदबाचें (१) लग्न अवंदा माघमासीं जालें आणि आपलाही खर्च अवंदा घरीं बसला. याजकरितां खर्चाची तंगचाई जाली. याजकरितां येसाजी खेडकर याजबराबर ऐवज पाटविला नाहीं. आपण सर्व प्रकारें स्वामींचे आहों. स्वामींच्या वचनावेगळे आपण नाहीं. बहुत काय लिहिणें, कृपा वृद्धीतें पावीत गेलें पाहिजे हे विनंति. १ तेरीख ८ जिल्काद शके १६६६: - ता० २ दिसेंबर इ. स. १७४४.