पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०५ देनें परम निष्ठेनें भेट घेतली. भेटीनंतर स्वामींनींही कुशल सांगितलें. असें परस्परें संतोषाचें भाषण जालें. मग आंगावरी दुशालाची जोडी होती ते राजश्रीचे आंगावरी प्रसाद घातला. मग तेथून राजश्री व आली आपले वाडीयांत आलो. अन्नप्रसाद सिद्ध जाला तो राजश्रीस xxx भोजन घातलें, व राजश्रीच्या बायकांस अन्नप्रसाद वस्त्रे राजश्री बरोबर देऊन सातारीयास रवाना केलें. बहुतसे अहेर करून श्रीस संतोषविलें. हें वर्तमान कळावें हाणोन लिहिलें, त्याजवरून सविस्तर कळों आले. संकटसमयीं तुर्की घोडा दिल्हा ह्मणून स्वामींनी लिहिले, तरी स्वामींचें तेज सामान्य नाहीं. श्री भार्गवस्वरूप आहेत. जो कोण्ही स्वामींस न मानी तो अविवेकी आहे. जे स्वामींचें स्वरूप समजले आहेत त्यास ते खामींचे मर्यादेस अंतर करीत नाहींत. बहुत काय लिहिणें, स्वामी समर्थ आहेत. कृपा असों दीजे हे विज्ञापना. [ लेखांक २०२] श्री. श्रीमत् सकल तीर्थास्पदीभूत भृगुनंदनस्वरूप बाबा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें संखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल स्वामींचे कृपेंकडून असे. विशेष स्वामींनीं आशी- र्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन बहुत समाधान जाहलें. बंदूख का- माची नाहीं याकरितां पाठविली आहे ह्मणोन स्वामींनी लिहिलें, त्या- वरून मुबदला बंदूख पाठवावी; परंतु पर्जन्य बहुत लागला, निभावणार नाहीं, यास्तव पाठविली नसे. मागाहून पाठवून देऊं व आंगवस्त्रें धोवट दोन नारायण फाटक यांजबराबरी पाठविलीं आहेत. घेतली पाहिजेत. बहुत काय लिहिणें कृपा वर्धमान करावी हे विनंति. - १ सखोजी आंगरे:- हा कान्होजीचा वडील पुत्र हा बापाच्या पश्चात् कुला- ब्याचा अधिपति झाला. परंतु तो दोन वर्षांनी ह्मणजे इ. स. १७३६ मध्ये वारला.