पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ [ लेखांक २०३] श्री. - श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:- अपत्यें मथुबाईनें चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग दंडवत प्रणाम: विनंति उपरी येथील कुशल ता० जेष्ठ वद्य अष्टमी भृगुवार पावेतों स्वामींचे आशीर्वादकरून सुखरूप असो. विशेष आशीर्वादपत्रिका आली होती त्याचें प्रतिउत्तर पेशजी आंबे रवाना केलें त्याजबराबर पाठविलें, तें पावोन सविस्तर कळों आलेंच असेल. यानंतर रा० बकाजी नाईक यांस बाणकोर्टी रवाना करून किल्ला फत्ते केला. तेथोन सारींच माणसें मंडणगडीं रवाना करून परीच घातला होता. दहा बारा दिवस खालीं बसोन मेटे घाटे चौगीर्द करून मौर्चे देऊन तोफांचा मार दिला. त्यामुळे लोक हकाफुका किल्ल्यावरी जाहले. स्वामींचे पुण्य- प्रताप करून छ १९ जिल्हेजी प्रातःकाळी किल्ला फत्ते केला. हें संतोषाचें वर्तमान स्वामींस विदित व्हावें यास्तव लिहिले असे. मंड- णगड बाणकोट स्वामींचे आशीर्वादकरून फत्ते जाहले. अंजनवेल व गोवळकोट राहिला असेत. त्याचाही यत्न करून शामलाचं निर्मूल आपले आशीर्वादेंकरून होईल. दोन्ही जागा हस्तगत जाहली- यावर श्रीचे पायांजवळ यावें हा हेत बहुतसा असे. हे मनोरथ सिद्धीस पावणें हेंही सांकडें श्रीसच असे जाहलें वृत्त सेवेसी नि वेदन व्हावें याजकरितां लिहिले असे. गोवाई आंबे पाठविणें हाणून आज्ञा, त्यास ये प्रांत प्रयत्न बहुत केला; परंतु गोबाई लावणी नाहीं. स्वामींनीं लिहिले होतें तें ईश्वरास खरें करणें, याजकरितां गोव्याहून आंबे घेऊन महागिरी वसईस गेली ते बंदरीं आली होती. त्याजवर आंबे थोडकेसे होते. परंतु स्वामींनी लिहिलें याजकरितां आंबे सुमार एकशें विकत घेऊन रवाना केले असेत घेऊन पावलीयाचें आशी- - १ मथुवाई: – ही कोणाची स्त्री ? - .