पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ . होणार नाहीं. कितेक वर्तमान नियाजी फाळके यांजपाशीं सांगितलें आहे. सेवेसी विनंति करितील तेणेंकरून स्वामींचें समाधान होईल. पाटिलांचें समाधान करून निंबाजी फाळके यांचे स्वाधीन केले आहेत. स्वामींनीं पाटिलांचें समाधान करून सुखरूप राहोन गांवची लावणी करीत तें केले पाहिजे. आह्मांपासून स्वामींचे सेवेस किमपि अंतर पडणार नाहीं. येविषयीं समाधान असो द्यावें. विशेष काय लिहिणें हे विनंति. १० आंगरे. श्री. [ लेखांक २०१] श्रीमंत परमहंस बाबा स्वामींचे सेवेसीः- - सेवक कान्होजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत. विनंति. येथील कुशल चैत्र बहुल सप्तमी सोमवार पावेतों जाणोन आशीर्वादलेखन केले पाहिजे. यानंतरी स्वामीनीं पत्रे पाठविलीं तीं पावली. लिहिलें कीं गोटणेंयाहून निघोन घांटावरी धावडशीस आलों. परंतु वाटेस उष्ण बहुत त्याचे श्रमानें ज्वराची बेथा शरीरों फार जाली. हें वर्तमान रा जश्री यांस कळलीयावरी सातान्याहून फाल्गुन वद्य नवमी आदितवारीं धावडशीस आले, तो आह्मी तळ्याचे कामावरी होतों. तो एक बा णाच्या टप्प्यावरून पायउतारा होऊन होतो तेथे आले. बहुतसी मर्या- १ कान्होजी आंगरे :- तुकोजीचा पुत्र हा इ. स. १६९८ मध्ये राजारामाच्या कारकीदीत मराठ्यांच्या आरमाराचा मुख्य अधिपति झाला. ह्यानें कुलाबा येथे आपली गादी स्थापिली. हा फार शूर व पराक्रमी होता. ह्यानें सुमारे ३० वर्षे पर्यंत मुसलमान व युरोपियन लोकांस वर मान काढू दिली नाही. त्याची मुख्य कारकीर्द इ. स. १६१८ पासून इ. स. १७२९ पर्यंत झाली. कान्होजीच्या मृत्यूच्या सनावद्दल बराच घोटाळा आहे. ग्रांटडफ इ. स. १७२८ अखेर ह्मणतो, व कुलाबा ग्याझेटीयरमध्ये १७३१ साल सांपडते. परंतु इ. स. १७२९ च्या प्रारंभास कान्होजी मृत्यु पावला असावा. कारण त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्रास ह्मणजे सखोजीस सरखेलपदाची सनद छ ५ मोहरम सलासीन ह्मणजे ता० २१ जुलई इ. स. १७२९ रोजी मिळाली आहे. तेव्हां त्यापूर्वी महिना दोन महिने तो बारला असावा.