पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०३ स्वामींचें आहे. आशेप्रमाणें गाई घेऊन येतील. व स्वामींनी जें वस्त्र माघारें पाठविलें तें आलीं वंदून प्रसादरूप ठेविलें. श्री सुदामदेव यांच्या मुठीभर पोह्या स्वामींनीं अंगीकारिल्या. ते थोर भक्त आह्मी स्वामींचे अज्ञान सेवक. याजकरितां सेवेसी वस्त्र १ एक पाठविले आहे. कृपा करून अंगीकारिले पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विनंति. [ लेखांक २००] श्री. श्रीमत् नियम प्राणायाम-प्रत्याहार-आसन-ध्यान-धारणा-समा- ध्यष्टांग-योगयुक्त श्रीमत् स्वामींचे सेवेसीः— सेवक आज्ञाधारक मुधोजी नाईक निंबाळकर साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल स्वामींच्या आशीर्वादें क्षेमरूप जाणून स्वकीय कुशल निरंतर आशीर्वादपत्र लेखन करून सांभाळीत असले पाहिजे. यानंतर स्वामींनीं कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ विदित झाला. मौजे रावडीचे विषयीं कितेक मजकूर तपसीलें लिहिला, ऐसीयास आपण पूर्वीच स्वामींच्या चरणासी विनंति केली कीं, येथील वतनदारीची रीति ऐसी आहे:- जो कजिया प्रथम होईल तो देशमुखाचे पार्शी येऊन विल्हेस लागावा. बाकीच्यांनी आ पला तनखा जो असेल तो घ्यावा व वतनी कजियामध्यें मन घाला- वयास प्रयोजन नाहीं. तेणेंप्रमाणें स्वामींनीं मान्य केलें, आजीवर चालत आर्ले, व पुढे चालवणार स्वामी समर्थ आहेत. पाटिलाचें ज्या प्रकारें समाधान करावयाचें त्या प्रकारें केलें. स्वामींनी समाधान असों द्यावें. आह्मांपासून किमपि स्वामींच्या सेवेमध्यें अंतर - १ मुधोजी नाईक निंबाळकर:- हा जानोजीचा मुलगा कारकीर्द इ. स. १७४८ इ. स. १७६५. त्याची पत्नी सगुणाबाई फार सद्गुणी व राजकारणी बायको होती. हिनें मुधोजीच्या पश्चात् फलटण संस्थानचा कारभार बरीच वर्षे चालविला होता.