पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ शरीरसंबंधाचें सांगोन पाठविले त्यावरून राजश्री महादेवभट व राजश्री बाळाजीपंत स्वामींकडे पाठविले आहेत. हे स्वमुखें वृत्त निवेदन क रितां विदित होईल. तें चित्तास आणून सोयरिकीचा निश्चय केला पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विनंति. [लेखांक १९८] श्री. नम ॐकारबीजाय विशुद्धाय चिदात्मने । गलिताखिलभेदाय गुरवे ब्रह्मरूपिणे ॥ १ ॥ श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- आज्ञाधारक जानोजी नाईक निंबाळकर साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील क्षेम स्वामींचे आशीर्वादेंकरून असे. स्वामींनीं कृपा क रून मधाची घागर एक पाठविली ते पावली. कृतार्थ झालों. "तुमचें चित्त श्री बोधल्याचे ठायीं आहे. आह्मीही साधुसंताची पायधूळ असों. आमचे ठायीं निष्ठा धरून दोन गाई आमच्या व्याल्या असतील त्या व दोन गाभण्या ऐशा ४ गाई पाठवणें" ह्मणोन लिहिलें, तर आझांस स्वामी साक्षात् राममूर्ति आहेत. येथील सर्वही खामींचें आहे. खिल्लारी स्वामींचे त्याजमध्ये गाई स्वामींचे आशेप्रमाणे पहिले पाठविल्या त्या दोन व आणीक हल्लीं दोन ऐशा चार गाई स्वामींचे सेवेसी पाठ- विल्या असेत. सर्वही स्वामींचें आहे. अंतरसाक्ष आहे. पत्रीं विस्तार ल्याहावा ऐसें नाहीं. केवळ स्वामींचे आझी सेवक असों सदैव कृपाव- लोकनें मांभाळीत असिले पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विज्ञापना. [लेखांक १९९ ] श्री. - श्रीमत् परमहंस साक्षात् श्रीराममूर्ति स्वामींचे सेवेसीः— आज्ञाधारक जानोजी नाईक निंबाळकर साष्टांग दंडवत विनंति उपरी स्वामींच्या कृपावलोकनेंकरून सेवकाचें सर्वस्वें क्षेम असे. स्वा- मींचा सेवक व आमचें एक माणूस गाई आणावयास गेले आहेत. सर्व