पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०१ . त्यांसी सांगितलें कीं रुपये घेऊन जाणें. त्यांणीं मान्य केलें कीं रुपयांस माणसें पाठवून घेऊन जातों. त्यासी हा काल माणसें न आली. पैकि यासी दिसगत जाली मग मुजरद एकंदाज व महार देऊन रुपये १५०० सेवेसी पाठविले ते घेऊन जाब पाठविला पाहिजे. ध्यानांत रुपये पावले ऐसें बाळकास लिहिले पाहिजे. बहुत काय लिहिणे, कृपा बाळकावरी करावी. श्रुत होय हे विज्ञापना. पौष्य वद्य नवमी शके १६६४ दुंदुभि नाम संवत्सरे, १०३० मेट ९ फलटणचे निंबाळकर. श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- सेवक जानोजी नाईक निंबाळकर चरणावर मस्तक ठेवून दंडवत प्रणाम विनंति उपरी येथील कुशल जाणून महाराजांनी स्वकीय कु शललेखनेंकरून संतोषाभिवृद्धि करीत असले पाहिजे. यानंतर महा- राजांनीं कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाथ विदित झाला. पत्र आशा कीं, तैऋप्राशनाकारणें गाई पाठवून देणें. ऐसीयास आपण जीवप्राणें स्वामींच्या पायाशीं एकनिष्ठ आहों. येथे गाई सिद्ध आहेत, परंतु प्रस्तुत दूध द्यावयाच्या गाई अगर अशी व्याल्या नाहींत. गाभण्या आहेत. आश्विन कार्तिकमासी विऊन दूध देतील ऐशा आहेत. विदित झाले पाहिजे. याउपरी आंग्रे यांजकडील [ लेखांक १९७ ] - १ पौष वद्य ९ शके १६६४ : - ता० ८ जानेवारी इ. स. १७४३ शनिवार २ जानोजी नाईक निंबाळकर:- फलटणचे देशमुख हे महाराष्ट्रांतील फार प्राचीन घराणे होय. ह्याचा मूळपुरुष वणगोजी हा होय. ह्याचा साहावा वंशज जानोजी हा होय. कारकीर्द इ. स. १६९३ इ. स. १७४८. ३ तक्रप्राशन: - स्वामी फक्त ताक पिऊन राहत असत व त्याकरितां ते गाई बाळगीत असत. पुणे नगरवाल मंदिर पुष्ण ८२१९० वर्ग ......... काक