पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणे नगर वाचन मंदिर, पुणे वर्ष ७ १०३१ मेट येथील देवस्थानावर दोन तीनशें लोकांनिशीं शिवरात्रीचे दिवशीं चाल केली. स्वामींचे देवालयाचा कारखाना व सर्व ब्राह्मणांचीं व कारकुनांचीं घरें लुट्न जप्त केलीं; आणि लोकांस फार उपसर्ग देऊन देवस्थानाचा अगदीं विध्वंस केला. त्यामुळे सर्व ब्राह्मण भयभीत होऊन आपापले जीव घेऊन पळाले. स्वामींचे तीन इमानी नौकर चिमणाजीपंत, बापूजीपंत आणि लखमोजी कोठावळा हे मोठ्या धैर्यानें राहिले. परंतु हवशी ह्यानें द्रव्यप्राप्तीकरितां त्यांची फार हालअपेष्टा करून त्यांना मरेमरेपर्यंत मार दिला.

      • ..Y

८२१९० 100000 हा वृत्तांत स्वामींस समजतांच स्वामींनीं कान्होजी आंग्रे ह्यांस पत्र पाठविलें कीं, "तुमचे लोकांनी आमचे समागमें हत्ती होता तो नेला. सबब सिद्दी सात शामल याणे परशुरामी स्वारी पाठवून, देवब्राह्मणांचा उच्छेद करून, वस्तवानी जप्त करून, बंद धरून नेला. कारकुनांस मारहाण करीत आहे, तरी पत्रदर्शनीं जयगडकरी यांस पत्र पाठवून हत्ती सोडून देववणे हत्ती न सोडल्यास तुझें कल्याण होणार नाहीं." असें स्वामींचें पत्र जातांच, कान्होजी आंग्रे ह्यांनीं जयगडचे हवालदारास, पत्रदर्शनी हत्ती स्वामींचे हवालीं करावा असा हुकूम पाठविला. त्याप्रमाणे त्यांनीं हत्ती स्वामींचे स्वाधीन केला. हत्ती घेऊन स्वामी दोनचार दिवसांनीं गोवळकोट येथे आले व लगेच सिद्दी सात ह्यास बोलावणें पाठवून हत्ती त्याचे स्वाधीन केला. तेव्हां सिद्दी सात फार लाचार होऊन स्वामींस शरण गेला; व अविवेकानें केलेल्या अ न्यायाबद्दल पश्चात्ताप पावून, “तकसीर माफ करावी" ह्मणून स्वामींची प्रार्थना करूं लागला. त्यानें परशुराम येथील देवब्राह्मणांचा उच्छेद करून ते महा- स्थान अगदीं भ्रष्ट करून टाकिलें, ह्यामुळे स्वामींस अतिशय दुःख झाले होतें. त्यामुळे त्यांनीं, “तुझा हत्ती आह्मीं आणिला तो घेणें तूं अविचार करून देवब्राह्मणांचा उच्छेद केलास. अतःपर तुझाही उच्छेद लवकरच होईल !” असा शाप देऊन ते परशुरामास निघून गेले. , परशुराम येतांच तेथे झालेला अनर्थ स्वामींच्या दृष्टीस पडला. तो पाहून स्वामींस अत्यंत दुःख झाले. सर्व देवालय खणून टाकिले असून देवाच्या मूर्ति फेंकून दिल्या आहेत, आणि चिमणाजीपंत, बापूजीपंत वगैरे दोन तीन कारकून- मंडळीस मरेमरेतों मारल्यामुळे त्यांची कंठगत प्राण अशी स्थिति झाली आहे,