पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० [ लेखांक १९५] श्री. श्रीमत् तीर्थरूप महाराज परमहंसबावा स्वामींचे सेवेसीः— आज्ञाधारक कृष्णाजी पवार विश्वासराव कृतानेक विज्ञापना ता० वैशाख शुद्ध चतुर्दशीपर्यंत स्वामींच्या कृपावलोकनेंकरून सेवकाचें वृत्त यथास्थित असे. चिरंजीव जिवाजीची मुली राजश्री दावलजी सोमवंशी यांच्या पुत्रास दिली आहे. हा विवाह व आपली कन्या राजश्री राजा- राम देशमुख प्रांत संगमनेर यांच्या पुत्रास दिली आहे, ऐसीं दोन्हीं लग्ने वैशाख वद्य पंचमी बुधवारी नेमस्त केलीं आहेत. महाराजांनीं कृपाळू होऊन दीनावर दया करून मंडप शोभा करणार स्वामी समर्थ आहेत. विशेष लिहिणें तर सर्व प्रसंग स्वामींच्या आशीर्वादाचा आहे. कृपा केली पाहिजे हे विनंति. [लेखांक १९६] - श्री. श्रीमत् परमहंस राजमान्यराजश्री भार्गवरामबावा स्वामी वडिलांचे सेवेसी: - आशांकित बालकें अपत्यानुरूप जिवाजी पवार सा० विज्ञापना ऐ- सीजे, तीर्थरूप रा० यशवंतराव पवार बाबा यांजकडे स्वामींचें कर्ज रुपये दहा हजार आहे. त्याचें व्याज मे ॥ रुपये दीड हजार आहे. त्यासी येथें रा० शेटियाजी खराडे फौज घरावयासी आले होते, त्यांसी पत्र तीर्थरूपांनी लिहिलें कीं, खामींस व्याजांत रुपये दीड हजार देणें. त्यासी रा० शेटियाजी खराडे यांनीं रुपये दीड हजार आह्मांपासीं ठेविले, आझीं राजश्री मल्हारपंत माळशिरसास रा० गोविंदपंत तुमचे होते १ कृष्णाजी पवार:- हे पवार विश्वासराव सुपेकर होत. — २ वैशाख शुद्ध चतुर्दशी: - ता० २१ मे इ. स. १७३९ शुक्रवार ३ वैशाख वद्य पंचमी बुधवार:- ता. १६ मे इ. स. १७३९. ४ जिवाजी पवार:- कृष्णाजी पवार विश्वासराव यांचा पुत्र.