पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ तानेक विज्ञप्ति स्वामींचे आशीर्वादेंकरून कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत समस्त क्षेम असो. विशेष महाराजे राजश्री भिऊवासमागमें आज्ञापत्र व प्रसादवस्त्र कुडती पाठविली ती शिरीं बंदून अंगीं घातली, येणेंकरून परम आल्हाद पावून स्वामींनीं ऊर्जित केलें हें संतोष ( दायक ) झालें. या उपरी आह्मांस ब्रह्मस्वापासून स्वामी मुक्त करतील. आह्मी कायावाचामनें स्वामींचे चरणरज असों. वरकड कित्येक अर्थ सेवेसी राजश्री भिऊचा श्रुत करितील. आह्नीं आजि कसबे वेले येथें मुकाम केला. पुढे मजल दरमजल उत्तर प्रांतें जाऊं. सेवेसी निवेदन होय हे विज्ञापना. [ लेखांक १९३] श्री. श्रीमंत महाराज राजश्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक आज्ञाधारक यशवंतराव पवार कृतानेक दंडवत वि नंति. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वामींकडील आशीर्वादपत्र येऊन कुशलार्थ अव गत होत नाहीं, याजकरितां चित्तास समाधान नाहीं. तरी लेखकास आज्ञा करून आशीर्वादपत्र प्रेषून सानंद आनंदविले पाहिजे. यानंतर आंबे व चांफे व नारळी वगैरे अपूर्व जिनसांचीं रोप व कलमें ऐसी बागामध्ये लावणी करावयासी व तोफ १ एक गढीमध्ये ठेवावयासी स्वामी कृपा करून सेवकास देतील तरी परम आल्हाद होईल. ऐसी- यासी येविसी आज्ञा केली पाहिजे. सेवेसी श्रुत होय, हे विज्ञापना. [ लेखांक १९४] श्री. श्री सकलतीर्थस्वरूप राजश्री भार्गवरामबाबा स्वामींचे सेवेसी:- चरणरज तुकोजी पवार चरणावरी मस्तक ठेवून सा० दंडवत - - - १ यशवंतराव पवारः - आनंदराव पवाराचा पुत्र कारकीर्द इ. स. १७४९- इ.स. १७६१. हा पुरुष पानिपतच्या लढाईत मारला गेला.