पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९७ होळकरानें घेतलें. कोट पाडून टाकिला. ऐसें वर्तमान जाहलें. स्वा- मींनीं प्रसाद श्रीफळ पाठविलें तें पावलें. विशेष काय लिहिणें हे विनंति. [ लेखांक १९१ ] श्री. - . श्रीमत् महाराज परमहंस श्री भार्गवरामबावा स्वामींचे सेवेसी:- विनंति आज्ञांकित चरणरज सोमाजी दाभाडे चरणावरी मस्तक ठेवून दंडवत विनंति उपरी येथील कुशल वर्तमान तागाईत आश्विन वद्य १४ पर्यंत स्वामींचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों यानंतर स्वामींनीं कृपावलोकन करून तीर्थरूपामागें कागद पाठविला तो पावला. त्यावरून बहुत समाधान जहालें तो अर्थ पत्र लिहितां पुरवत नाहीं. तीर्थरूप तो कैलासवासी जाले ! मृत्यूस इलाज नाहीं !! बरें, सर्व प्रकारें आह्मांस आपण वडील आहांत. सर्व भरंवसा आपले आशीर्वादाचा आहे. वि स्तारें लिहावेंसें नाहीं. आपण आपले सेवक असों. नारोजी घाणेकर यानेंही कित्येक प्रकारें आशावचनें आपलीं सांगितलीं व पत्र लेख केली. त्यासी प्रस्तुत पैका नाहीं. खर्चाची तंगचाई आहे. बहुत इलाज करून रुपये शंभर नारोजीहस्ते पाठविले आहेत व शेला १ पाठ- विला असे. तो अंगीकारिला पाहिजे. बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे हे विनंति. ८ पवार. [ लेखांक १९२ ] श्री. - श्री सच्चिदानंदकंद श्री परमहंसवावा वडिलांचे सेवेसी:- आज्ञाधारक चरणरज आनंदराव पवार चरणावर मस्तक ठेऊन कृ १ सोमाजी दाभाडे – हा कोणाचा मुलगा ? २ आनंदराव पवार : - धार संस्थानचा मूळ स्थापक कारकीर्द इ. स. - १७३४-इ. स. १७४९.