पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ तमान स्वामींस कळावे ह्मणून लिहिले आहे. रात्रंदिवस स्वामींच्या चरणाचा निजध्यास आहे. त्यास तिळतुल्य अंतर नाहीं. स्वामींनीं पूर्वीइतके लोभास अंतर न करावें हें भाग्यवैभव अवधे देणें स्वा- मींचें आहे. बहुत लिहिणें उपरोध आहे. कृपालोभ निरंतर असों दीजे हे विनंति. [ लेखांक १८९] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसी:- विनंति सेवक कृष्णाजी दाभाडे सा० दंडवत प्रणिपात विनंति येथील कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. स्वामींनी कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन वर्तमान कळले. मातुश्री उमाबाई यांनी राजश्री अंतोबानाईक गुडे यांजकडून रुपये ४००० देविले. त्यासी ऐवजाची येथेंही देण्याची वोढी होती, परंतु महाराजांस देणें अगत्य, याजकरितां कर्ज घेऊन राजश्री अंतोबानाईक यांजपासून उत्तम सुरती स्वामींच्या सोनाराचे परीक्षेनें सदरहू चार हजार रुपये खंडोजी साळवी याचे पदरीं घातले असेत तरी मातुश्रीबाईस पत्र पावतीचें लेहून जासूद जाणार त्याबरोबर पाठवून ( द्यावें ). बहुत काय लिहिणें ? फणस पाठविले ते पावले. विनंति. [ लेखांक १९०] श्री. श्रीमत् राजश्री बावा स्वामींचे सेवेसी:- - विनंति सेवक कृष्णाजी दाभाडे साष्टांग दंडवत. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वा- मींनी पत्र लिहिलें, “मातुश्री बाईकडील वर्तमान कळत नाहीं." तरी बाई अमदाबादेवरी आहेत. चांफानेरचें वर्तमान लिहिलें, बांड्यापासून १ हे पत्र उमाबाईनी अहमदाबादेवर मोहीम करून ते शहर सर केले त्या वेळचे दिसतें. ही मोहीम इ. स. १७३४ मध्ये झाली.