पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९५ . नवापूरच्या मजमूचें लिहिलें, त्यास तेथें गरीब ब्राह्मण, त्यास तीन पिढ्या जाल्या. सांप्रत बारा वरसांचें मूल आहे. त्याची बालपरवेसी चालत आहे. सेवेसी कळावें दाणोन लिहिलें असे वस्त्रें येणेंप्रमाणें पाठ- विलीं तीं पावलीं. शालू चार बन्हाणपुरी, झगे दोन, छिटें एक एकूण सात सणगें पावलीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक १८८] श्री. - श्रीमत् सकळतीर्थस्वरूप महाराज श्री भार्गवराम स्वामींचे सेवेसी:- अपत्यानुरूप कृष्णाजी दाभाडे चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत. विनंति उपरी येथील क्षेम ता० वैशाख वद्य पंचमी मुकाम सातारा सुखरूप असो. स्वामींकडील वर्तमान बहुत दिवस कळले नाहीं, येणेंकरून चित्तास समाधान नाहीं. तरी येणाराबरोबरी पत्र पा- ठवून सांभाळ केला पाहिजे. आमचें वर्तमान तरी, गुजराथ प्रांतें रा० बाजीराऊ पंडित प्रधान यांचें व रा० त्रिंबकराऊ दाभाडे से- नापति यांचें युद्ध जालें, ते समय रा० सेनापति व रा० मलोजी पवार यांस जखमा लागोन देवाज्ञा झाली. त्यावरी महाराज राजश्री स्वामी व समस्त सरदार कुल तळेगांवास जाऊन, मातुश्री उमाबाई यांचें बहुत प्रकारें समाधान करून आपणास व मातुश्रीस फौजेसह- वर्तमान सातारीयास घेऊन आले. याउपरी मनोदयानुरूप कारभार होऊन, अविलंबें निरोप घेऊन, माधारें तळेगांवास जाऊं. सकळ व , १ कृष्णाजी दाभाडे:- हा कोणी जवळचा नातेवाईक दिसतो. उमाबाईस विकराव, यशवंतराव व बाबूराव असे तीन पुत्र होते. हा ज्याअर्थी उमाबाईस मातुश्री अर्से लिहितो त्याअर्थी पुत्रवर्गापैकींच असावा. - २ वैशाख वद्य पंचमी:- ता० १५ मे इ. स. १७३१, शनिवार डभोईची लढाई झाल्यानंतरचें हे पत्र आहे. डभोईच्या लढाईचें वृत्त बाजीरावांनी स्वामींस लिहिर्लेच आहे. लेखांक २६ पहा.