पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ लिहिले, त्यास दहा हजारांचा विषय काय आहे? जे आहे तें महा- राजांचें आहे. पुढेही देणार महाराज समर्थ आहेत. पांच हजार रुपये दो महिन्यां पाठवून देतों. बाकी राहिले तेही पाठवून देऊं. बाणावि- पय मुजरद माणसें पाठविलीं आहेत. सत्वरीच सेवेसी प्रविष्ट होईल. बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे, हे विज्ञापना. [लेखांक १८६] श्री. श्रीमत् परमहंसचावा स्वामींचे सेवेसी:- - अपत्यें उमाबाई दाभाडे कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. आपण कृपाळू होऊन आशीर्वादपत्र पाठविलें तें शिरसा बंदून परमानंद जाहला. ऐवजाविशीं लिहिलें ऐसीयास आझांपासून अंतर पडलें, परंतु आठां चौ रोजां येथील कामकाजाचा गुंता चालीस लागला ह्मणजे आपल्या- कडील ऐवज पोहोंचता होईल. सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लिहिणें, कृपा निरंतर कीजे हे विनंति. [ लेखांक १८७] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसीः— अपत्यें उमाबाई दाभाडे साष्टांग दंडवत विनंति विज्ञापना येथील कु- शल आश्विन बहुल त्रयोदशी इंदुवासरे परियंत यथास्थित असे विशेष. धावडशीस पावलीयावर आशीर्वादपत्र व वस्त्रे सोनजी पांडिया याजबरो- वर पाठविली तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन आज्ञेप्रमाणे चिरंजीव राजश्री सेनापती व उभयतां चिरंजीवांस दिल्हीं बन्हाणपुरी शालू चार आह्नीं घेतले. द्रव्याचा विचार लिहिला तर नियताप्रमाणें मुदतीस प्रविष्ट होतील. चिंता नाहीं. आपणासीं करार केला आहे त्यास अंतर सहसा होणार नाही. गायकवाडाकडील मजकूर लिहिला तर सर्व प्रसंग पदरचाच आहे. अवंदाचा प्रसंग वोढीचा, यास्तव विनंति केली असे. -