पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९३ ७ दाभाडे. [ लेखांक १८५ ] श्री. - श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- अपत्यें उमाबाई दाभाडे चरणावर मस्तक ठेवून साष्टांग दंडवत. विनंति विज्ञापना. येथील महाराजांच्या आशीर्वादेंकरून फाल्गुन बहुल १० पर्यंत यथास्थित असे विशेष. महाराजांनी कृपा करून पत्र पाठविलें तें शिरसा बंदून अभिप्राय अवगत जाला. स्वामीसीं बोलिलों होतों कीं, यंदा पांच हजार घ्यावे; पुढें नीट नेटकें जालीयावर पांच हजार घ्यावे. त्यास, तळेगांवास आलीयावर फौजेची समजाविशी क रितां वोढीचा प्रसंग जाला. याजकरितां प्रस्तुत अंतर पडले. स्वामींच्या पायांशीं निश्चय केला आहे त्यासी प्राणांती अंतर पडणार नाहीं. सर्व गोष्टीचा मानाभिमान महाराजांस आहे. संवत्सर प्रतिपदा जाली- यानंतर उत्तर प्रांतास जातो. गेलियानंतर देवालयाचा ऐवज अवि छिन्न पावता करूं. अंतर होणार नाहीं. आपण स्वमुखें लेक हाटलें आहे त्याचा सर्व अभिमान वडिलांस आहे. जगासाठीं रागें भरून . - - १ उमाबाई दाभाडे: – खंडेराव दाभाडे सेनापति यांची पत्नी व त्रिंबकराव दाभाडे यांची आई. ही फार चतुर व पराक्रमी बायको होती. बाजीरावांचें व त्रिंबकरावाचें डभोई मुक्कामी युद्ध होऊन त्रिंबकराव मृत्यु पावल्यानंतर हिला फार दुःख झाले. त्या वेळी खुद शाहूमहाराज हिच्या सांत्वनाकरितां तळेगांवास गेले होते. त्यांनी बाजीराव पेशव्यांस हिच्या ओट्यांत घालून तिचा राग दूर केला. ह्या शूर अबलेने पुढे अहमदाबादेवर स्वारी करून तेथील यवन सुभेदार •जोरावरखां बाबी ह्याचा पराभव केला. त्या वेळीं हिनें हत्तीवर अंबारीत आपल्या अल्प- वयी दोन पुत्रांसह बसून युद्ध केलें. उमाबाई बायको माणूस असतां शिपाईगिरीची शर्थ केली ह्मणून छत्रपति महाराजांनी सोन्याचे तोडे तिच्या पायांत घालून तिचा बहुमान केला. ह्या स्त्रीस 'शूर अवला' हे नांव यथार्थ शोभतें ही इ.स. १७४७ मध्ये मृत्यु पावली. १३