पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ स्वामींनीं कृपा करून आज्ञापत्र पाठविलें व पाटाव ठेविले आहेत ते पाठवून देणें. व सटवाजी यादव याजबरोबर ऐवज: ३ नाणें मोहरा येणेंप्रमाणे पाठविलें असे. घेतले पाहिजे. प्रसाद खजूर पाठविला तो पावला. लष्करचें वर्तमान लिहिणें ह्मणून आज्ञा केली, ऐसीयास राजश्री पंतप्रधान व चिरंजीव पिलाजी व मोंगल भाऊ ऐसे हिंगणगांवावरी येऊन मुर्चे लाविले आहेत. स्वामींस कळावें झणून लिहिलें असे. विशेष काय लिहिणें, कृपा निरंतर असों दीजे हे विनंति. [ लेखांक १८४] तेथें आज्ञा केली, कीं पैक। त्यावरून निंबाजी तोरसकर - २ पाटाव, ६० नक्त रुपये, - ६ गायकवाड. श्री. श्रीमंत परमहंस परिविराजित श्री स्वामींचे सेवेसी:- - सेवक दमाजी गायकवाड समशेरबहादूर विज्ञापना येथील कुशल जाणोन स्वामींही आपले कृपेचें वर्तमान कळवून पेशजी सनाथ करीत गेलें पाहिजे. विशेष कृपा करून पत्र पाठविलें तें पावून परम आनंद झाला. श्री स्वामी स्वर्गी विराजमान जालियावर स्वामींची स्थापना त्या स्थळीं जाली, हें श्रवण होऊन परम आल्हाद जाला. आह्नीं पदरचे असून निरंतर कृपावंत असून पत्रद्वारें सनाथ करावयासी कृपा करीत जावें. बहुत काय लिहिणें हे विज्ञापना. १ १ दमाजी गायकवाड:- हे पिलाजी गायकवाडाचे पुत्र. हे पिलाजीचा वध झाल्यानंतर गुजराथचे अधिपति झाले. ह्यांची कारकीर्द इ० स० १७३२ पासून इ० स० १७६८ पर्यंत ह्मणजे सरासरी ३२ वर्षे झाली. हे आपल्या वडिलां प्रमाणेच कर्तृत्वपटु होते. २ स्वगी विराजमान झाल्यावर ह्मणजे स्वामींनीं समाधि घेतल्यानंतर हे पत्र लिहिले आहे असे दिसतें. ह्यावरून या पत्राचें साल ३० स० १७४५ हे अमूं शकेल. स्वामींचा काल झाल्यानंतर देखील त्यांच्याच नांवाने लिहिलेली कित्येक पत्रे आमच्या पाहण्यांत आली आहेत. परंतु स्वामींच्या पश्चात् बहुधा 'समाधिस्थ परमहंस स्वामी' असे लिहिण्याचा परिपाठ होता.