पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१ सोयरिका जाल्या. परंतु त्या सोयरिका तिही जागा चिरंजीव जाल्या नाहींत. हें वर्तमान राजश्री चिमाजीपंत आपा व आह्मी गतवर्षी स्वा- मींचे दर्शनास आलों ते समयीं श्रुत केलें होतें. त्यावरून स्वामींनीं आज्ञा केली कीं दुसरे ठिकाणीं सोयरीक पहाणें. त्यावरून आज्ञेप्रमाणें विवंचना करीत होतों. त्यास राशीनचे काळे अवंदा येऊन नवरा पा होन गेले. परंतु पानें वांटावीं हें राहिले आहे. आपले आज्ञेखेरीज पानें कशीं वांटावीं ? रामनगरकराकडे नवरी आहे तिचा बापही अ वंदा मेला. नरहरपंत तेथून आले होते. त्यांणीं सांगितलें कीं सोयरीक करा, पानें बांटावयासी पाठवा. त्यास आझीं जाब सांगितला कीं, ये विसींचा जाब आझी वाघोलीस गेल्यावरी सांगूं. त्यांणीं स्वामींसही पत्र लिहिलें असेल. ऐसीयासी त्या सोयरिका चिरंजीव होत नाहींत. स्वामींस विदित आहे. आणि रासीनचे काळे ह्मणोन सिदोजी निं बाळकराचे सासरे व शिऊबाईचे भाऊ भले आहेत आणि स्वामि- भक्त... आहेत. वतनदारही आहेत. नवरा तो पाहोन गेले. पानें वांटावीं इतकें राहिले आहे. येविसीं स्वामींची आज्ञा होईल त्याप्र- माणे वर्तणूक करूं. सविस्तर वर्तमान खंडोजी साळवी यासी सां- गितले आहे. सेवेसी निवेदन करील त्यावरून कळेल. या पत्राचा जाब राजश्री अंबाजीपंत यांजकडे पाठवावा. ते सेवकास पावता क रतील. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञप्ति. [ लेखांक १८३] श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसीः– विनंति सेवेसी हंसाई आऊ जाधव श्री चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल जाणून स्वामींचे आशीर्वादें- करून ता० छ० ९ रजब पावेतों समस्त कुशलरूप असो. यानंतर १ हंसाईआऊ:- पिलाजी जाधवरावांची आई. -