पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वामी आपल्याबरोबर दाद गुरव कर्णेकरी, अंताजी नारायण कारकून, आणि खंडोजी साळवी निशाणवाला असा परिवार व सिद्दी सात यांजकडील दहा पठाण बरोबर घेऊन सावनूर बंकापूर येथे गेले. व तिकडील प्रांतांतील भिक्षाद्रव्य संपादन करून व सावनूरकर पठाणाचा हत्ती बरोबर घेऊन विशा- ळगड मार्गाने परत आले. त्यांस मध्यंतरीं विशाळगडच्या घांटामध्यें प्रति- निधींच्या चौकीदारांनी अटकाव केला. परंतु स्वामींनीं किल्ल्यावरील अधि काऱ्यास पत्र पाठवून व सर्व हकीकत कळवून हत्ती नेण्याची परवानगी घेतली. सिद्दी सात ह्यानेही प्रतिनिधींस अगोदर विनंतिपत्र पाठविले होतें, त्यामुळे तेथें विशेष अडचण पडली नाहीं. तेथून निघाल्यानंतर घांट उतरून स्वामी हत्तीसहवर्त्तमान कोंकणांत आले. तो कोंकणच्या नाक्यावर माखजन येथें आंग्रे व हवशी ह्यांच्या चौक्या होत्या. तेथें दोहींकडील चौकीदारांमध्ये तंटा उपस्थित झाला. आंग्रे यांच्या लोकांनी जयगडची मदत आणवून हत्ती आपल्या ताब्यांत घेतला आणि तो जयगडास पाठवून दिला. स्वामी स्नानसंध्येकरितां मागील मुक्कामावर राहिले, तो इकडे त्यांच्या पश्चात् असा घोंटाळा झाला. स्वामी माखजनीं येतात तो त्यांस हे वृत्त समजले. तेव्हां त्यांनी जयगड येथील हवालदाराकडे सामोपचाराचा निरोप पाठवून हत्ती परत मागितला. परंतु तो येण्याच्या आंतच, ही बातमी हबशाकडील लोकांनी अंजनवेलीस पोहोंचविली, व सुभेदार सिद्दी सात ह्यांस असे कळविलें कीं, ‘‘गोसावी ह्यांनीं हत्ती समागमें आणून माखजनचे चौकीवर कञ्चियाचे निमित्त करून हत्ती आंग्रे यांचे लोकांचे स्वाधीन केला. " सिद्दी सात ह्यास ही बातमी कळतांच त्याचा क्रोधाग्नि प्रज्वलित झाला. सिद्दी सात हा जातीचा हवशी असल्यामुळे हिंदूविषयीं त्याचा. अगोदर प्रेमभाव कमीच होता. परंतु जंजिऱ्याचे बडेखान ह्यांनीं स्वामींचा सत्कार करून त्यांच्याविषयीं अगत्यवाद धरल्यामुळे, सर्व हबशी लोकांस स्वामीं- विषय बाह्यात्कारें तरी पूज्यबुद्धि बाळगणे भाग पडलें होतें. त्याप्रमाणें सिद्दी सात ह्याची स्थिति होती. त्यास आपला बहुमानाचा हत्ती, स्वामींनी चौकीदाराकडून तंट्याचें मिष करवून, आपल्या जातभाईस दिला; एवढी बातमी कळतांच, त्यास संताप उत्पन्न होऊन त्यानें एकदम स्वामींच्या परशुराम ,