पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[लेखांक १८२] श्री. श्रीमत् महाराज श्री परमहंस स्वामींचे सेवेसीः— चरणरज पिलाजी जाधवराऊ चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दं- डवत विज्ञापना ता० आश्विन वद्य चतुर्थी इंदुवार मुकाम राजपुरी से- वकाचें वर्तमान श्रीकृपेनें यथास्थित असे विशेष. आझी कुलाबा होतों ह्मणोन स्वामींनीं आज्ञापत्र सादर केलें, तो इतक्यांत सेवक कुलाब्या- हून निघून राजपुरीस आला. राजपुरीस स्वामींचें आज्ञापत्र आलें. तेथें आज्ञा कीं, कृष्णंभट देशमुख प्रांत राजापूर याचे इसाफतीचे गांव होते ते राजश्री संभुसिंग आंगरे यांणीं दूर करून अंत प्रभु यांसी दिल्हे. पुरातन चालत आले आहे त्यास विक्षेप करावा हाणिजे काय ? ये- विसीं तुझी राजश्री संभुसिंगास सांगोन कृष्णभटाचे गांव कृष्णभ टास देवणें ह्मणोन आज्ञा. ऐसियासी आज्ञा शिरसा वंदिली. राजश्री संभुसिंगही चौरोजां कुलाब्याहून राजपुरीस येणार. आपले आज्ञेप्र माणें त्यांस सांगोन कृष्णभटाचे गांव कृष्णभटास करार करवावे. तों आजीच खंडोजी साळवी यांणीं वर्तमान जबानीं सांगितलें कीं, कृ- ष्णभटाचे गांव राजश्री संभुसिंगानें करार करून सनद करून दिल्ही आहे. स्वामींसी त्यांणीं वचन दिले आणि आपणही आज्ञा केली ते आज्ञा उल्लंघन कोण करणार आहे ? सेवेसी विदित झाले पाहिजे. पूर्वी स्वामींची आज्ञा होती कीं, चिरंजीव आपाच्या पुत्रास रामनगर- कराकडील सोयरीक करार केली आहे तें करणें हाणोन. ऐसीयासी रा मनगरकराच्या सोयरिका ती जागा जाल्या. एक अंबोजी देशमुख, दुसरे वासदेकर राजे, तिसरे महाराज राजश्री संभाजी राजे, ऐशा - - १ आश्विन वद्य ४ इंदुवार:- ही तिथि दोन सालांत ह्मणजे इ० स० १७३३ मधील सप्तंबरच्या १५ तारखेस व इ० स० १७४३ मधील सप्तंबरच्या २६ ता रखेस येते. ह्यांतील खरी तारीख निश्चित करण्यास पत्रांत उल्लेख केलेल्या सनदा किंवा लग्नाची मिति समजली पाहिजे.