पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८९ होईल तेथें अवधे भक्तिज्ञान आहे. महाराज, दृष्टांत तुझांस काय लिहावा ? औरंगजेब, कान्होजी आंग्रे, हापशी काय घेऊन गेले ? संपदा कोणासमाग में गेली नाहीं ह्मणून लिहिलें, तरी संपदा कोणा- समागमें गेली नाहीं. यास्तव स्वामींच्या चरणांचा निजध्यास करावा तोच कामास येईल. जोतीबाच्या लग्नास बोलाविले नाहीं ह्मणून लिहिलें, तरी हें अंतर चिरंजीव संभाजी जाधव याजपासून पडिलें हैं। खरेंच; परंतु लेकरापासून अंतर पडलें तरी माय आहे, तीस लेंकरां- पासून अन्याय झाला येणें करोन असे कळोन क्षमा करून माया न्यून करिते ऐसें नाहीं. सर्व क्षमा करावयास स्वामी समर्थ आहेत. "आपण पैक्याकरितां तुमच्या गळां पडत नाहीं. भुलोबाचें देऊळ राहिले तरी राहो परंतु तुझांस कष्टी करणार नाहीं," हाणून लिहिलें, तरी स्वामींनीं जें चित्तीं धरिलें तें शेवटास गेलेंच आहे. देऊळ राहतें असें नाहीं. आणि आझांपासीं जे आहे तें अवधें स्वामींचेंच आहे. कायावाचा- मनसा स्वामींचे आज्ञेविरहित नाहीं खामींनी कृपाळू होऊन मध व रोपें कुंदाचीं व बटमोगऱ्याचीं व फणसपोळी पाठविली ती पावली. " फणसाच्या रोपास माणूस पाठविला तो सोनजी पाटील ह्यसवेकर याजविषयीं राजश्री पंतप्रधान यास सांगितले. त्यांनी आपल्या पाया- वरी हात ठेविला आहे कीं, त्याची स्थापना गांवावरी करितों. तरी तुझीं त्यास व राजश्री बापुजीपंत नानास सांगणे. तुमची भीड आहे” झणून लिहिलें. ऐसीयास राजश्री पंतप्रधान यांनीं आपणासी नियत केलीयावरी ते गोष्टी सिद्धीस पावतील. आणि आह्मीही स्वामींचे आ शेवरून सर्वस्खें भीड वेंचून सांगों परंतु त्याचा बाद महाराज रा जश्री स्वामींकडे जातो. तेथीलही बंदोबस्त करणें तो स्वामींनीं केला पाहिजे. स्वामींनीं चित्तीं धरिलें आहे तरी याउपरीं त्यांचें ऊर्जितच आहे. विशेष काय लिहिणें, कृपा निरंतर असों दीजे हे विज्ञापना. .