पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ लेखांक १८१] १८८ जाधवराव. श्री. श्रीमत् महाराज साक्षात् भार्गवरामअवतार भक्तजन- प्रतिपालक स्वामींचे सेवेसी:- चरणरज आज्ञाधारक पिलाजी जाधवराव कृतानेक विशापना वि नंति येथील कुशल स्वामींचे कृपावलोकनेंकरून ता० आषाढ शुद्ध ९ भोमवासर पावेतों स्वामींच्या चरणांच्या निजध्यासें आनंदरूप असो विशेष. कृपा करून आज्ञापत्र पाठविलें, तेथें लिहिले की “मजला थोडेंसें शान आहे. तूं दोन जन्माचा गडी आहेस." तरी देवास ज्ञान थोडें आहे कीं फार आहे हे त्याचा तोच जाणे. आणि भक्त केवळ एका दोन ज न्माचा सांगाती आहे असें नाहीं. जेथून देव तेथून भक्त असें चरित्र आहे. गतवर्षी भुलोबाजवळ पाऊसाकरितां बैसलों, देवानें पाऊस दिल्हा; तरी स्वामींच्या चित्तांत पाऊस पडावा असें जालें तेव्हां भुलोबासही संकट पडलें. ते गोष्टीचें अपूर्व नाहीं. तुलीं आपला समाचार घेतला नाहीं; मग आपण राजश्री दमाजी गायकवाड यांजकडे गेलों. तेथील भक्तीचा सविस्तर अर्थ लिहिला. तरी देवास भक्त बहुत आहेत. त्यामध्यें आह्मींच कांहीं भक्त ऐसा अभिमान करावा तरी अर्जुना- सारिख्यांचा भक्तीचा अभिमान शेवटास गेला नाहीं. देवानें त्यास भक्त त्याहून विशेष कित्येक दाखविले. परंतु अर्जुनासारखी देवाची कृपा आणिखे थळीं नव्हती. कर्ण दानशूरच होता परंतु भक्तीचें अभिधान नव्हतें. परंतु सर्व देणें देवाचें आहे. देवाची कृपा जेथें - - १ पिलाजी जाधवराव:- हे वाघोलीचे जाधव. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कारकीदींमध्ये ह्या वीरपुरुषाने मराठ्यांच्या बहुतेक प्रमुख मोहिमांमध्ये आपला पराक्रम चांगला व्यक्त केला. कारकीर्द इ० स० १७२५-१७४६. २ आषाढ शुद्ध ९ भोमवासरः - ता० ३ जुलई ३० स० १७३९.