पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८७ ● संतोषावाति जाहली. जागा जागा कारखाने चालिले याजमुळे खर्चाची चोढ फार जाली, याजकरितां ऐवज पाठवावा ह्मणून आज्ञा झाली; ऐसीयासी आजिपर्यंत मुलुखगिरीस गेलों होतों, प्रस्तुत आपले दयें- करून स्वस्तिक्षेम सातारियासी पावलों. आपल्या चरणांचा सदैव निजध्यास आहे. स्वामींनीं ल्याहावें ऐसें नाहीं. याजउपरी थोडक्याच दिवसांत ऐवजही पाठविला जाईल. शालजोडीविसीं लिहिलें तरी चार गजी शालजोडी कांहीं संग्रहीं नाहीं. या गोष्टीचा तलाश करावा लागतो. असलियावरी सेवेसी पाठविली जाईल. स्वामींच्या आज्ञेव्य- तिरिक्त दुसरा विचार नाहीं. सदैव आशीर्वादपत्रीं संभाळ केला पाहिजे. शाकभाजी मिरच्या वगैरे पाठविल्याप्रमाणें जिन्नस पावला. वरकड सो- माजी विनंति करितां सेवेसी निवेदन होईल. बहुत काय लिहिणें हे विनंति. [ लेखांक १८० ] श्री. श्रीमंत राजश्री परमहंसवावा स्वामींचे सेवेसी:-

-

अपत्यें फत्तेसिंग भोंसले कृतानेक दंडवत विज्ञापना स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. बापुभट मोघे तळेगांवकर यांकडील मजकूर लिहिला, ऐशास पूर्वी राजश्री निळप्रभु कारभार करीत होते. त्या वेळेस त्यांनीं बापुभटाकडून काय घेतलें दिल्हें असेल तें त्यांचे त्यांनीं वारिलेंच असेल. ते वेळेचा गुंता अद्यापि राहिला आहे ऐसें नाहीं. जळित कागदपत्र हिसेब त्यापासीं राहिला अ सला तरी तो आह्मांस कांहीं दखल नाहीं. आह्मीं जाबसाल कशाचा करावा ? आपलें देणें घेणें त्याकडे असेल तरी त्यापासून निर्वाह करून घ्यावयाचें कोणतें अगाध आहे ? आह्मांकडे त्याचा गुंता कांहीं नाहीं. येविसींचा अर्थ सविस्तर सोमाजीपार्शी सांगितला आहे. सेवेसी वि नंति करितां श्रुत होईल. वाड्यांत प्रसादवस्त्रें सोमाजीबराबर पाठ- विलीं तीं पावलीं. बहुत काय लिहिणें स्वामी वडील आहां. हे विनंति.