पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ जिल्हेज मुक्काम वरखेडें वडगांव गंगातीर स्वामींचे आशीर्वादें सुखरूप असों यानंतर स्वामींनीं आज्ञापत्र पाठविलें तें मस्तकी वंदोन सनाथ जाहलों. श्रीचा प्रसाद पाठविला तोही पावला. हौसी व पशमीविसीं लिहिलें, त्यास, सध्यां तो अनुकूल नाहीं. मुलुखगिरीहून आली- यावरी अवश्यमेव पाठवून देऊं. सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करावयास स्वामी समर्थ आहेत. हे विनंति. [ लेखांक १७८ ] श्री. महाराज श्री स्वामींचे सेवेसीः— - - चरणरज राणोजी शिंदे दंडवत विनंति विज्ञापना. सेवकाचें वर्तमान ता० कार्तिक शुद्ध ९ स्वामींचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे विशेष स्वामींकडून रा० केसोपंत आले, त्यांची रवानगी येणें- प्रमाणे केली. चितपशील: – खासगत ३००० नक्त रुपये तीन हजार, १ पासोडी, कारकूनबाबत २०० नक्त रुपये, १ पागोटें देणें केसोपंत, सदरहुप्रमाणे सेवेसी प्रविष्ट होईल. पुण्यांत असतां घोड्याची विनंति केली ते समयीं स्वामींनीं हेलणा केली. आह्मी तर आज्ञेप्रमाणे वर्ततों, आणि महाराजांनीं घोड्यासाठीं विनंति मान्य न करावी येणेंकरून सेवकास उदासीनता वाटते. तर, ऐसें न करितां कृपाळु होऊन घोडा 'दिल्हा पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति. ४ भोंसले अक्कलकोटकर. श्री. [ लेखांक १७९ ] सकल तीर्थस्वरूप श्रीमत् परमहंस स्वामी स्वामींचे सेवेसी:- अपयें फत्तेसिंग भोंसले दंडवत विज्ञापना येथील वर्तमान तागाईत आषाढ शुद्ध अष्टमी स्वामींच्या आशीर्वादेंकरून कुशल असे विशेष. कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन १ फत्तेसिंग भोंसले- कारकीर्द ३० स० १७१२-१७६०. - -