पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८५ कुशल जाणून स्वकीय लेखन आज्ञा करीत असिलें पाहिजे. विशेष. कृपा करून प्रसादवस्त्रें आहेर पाठविला, तो लिहिल्याप्रमाणें पा- वला. ऐवजाविशीं बहुत निकडीनें लिहिलें, त्यास पहिला ऐवज पावणे तो सेवेसी पावला, हल्लींही राहिला तो पाठवावा; त्यास मध्यें स्वामींचे आशीर्वादें लग्नकार्य उपस्थित जाहलें. हेंही आपले दयें- करून सिद्धीस गेलें. हें कार्य होतच आहे तो श्रीमंतांचें पत्र आले कीं, मुलुकगिरीस सत्वर जाणे. त्यावरून सुमुहूर्ते बाहेर निघालों. पुढे मजल दरमजल जावें असा हेत आहे. त्यास सांप्रत ऐवजाचें नि- मित्य अनकूल न पडे. ऐवज आपणास सत्वर प्रविष्ट होईल. आपण दुसरा अर्थ चित्तांत आणावा ऐसें नाहीं. ऐवज सत्वरच पावता करूं. कळले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १७६] श्री. श्री ईश्वरस्वरूपमूर्ति राजश्री भार्गवबावा स्वामींचे सेवेसी:- सेवेसी सौभाग्यवती गौतमाबाई होळकर चरणावर मस्तक ठेवून दंड- वत विनंति उपरी येथील आमचें वर्तमान, तर स्वामींचे कृपादृष्टीकरून पौष शुद्ध तृतीया पावेतों सुखरूप असो. यानंतर आपण स्वारीस पौष शुद्ध द्वितीयेस गेलों. यानंतर सेवेस पाटाव सुमार १, मोत्यें २१ एकवीस सेवेसी पाठविले आहेत, ते घेतले पाहिजे. बहुत काय लि- हिणें ? सदैव बालकावर कृपा करीत जाणें हे विज्ञप्ति. • ३ शिंदे. श्री. - [ लेखांक १७७ ] हरिभक्तिपरायणश्री भार्गवराम बावा स्वामींचे सेवेसी:- सेवक राणोजी शिंदे दंडवत विनंति येथील कुशल ता० छ १७ १ गौतमाबाई:- मल्हारराव होळकरांची पत्नी. ही फार स्वाभिमानी बायको होती. - -