पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८४ नारळें १० लावावयासी, ५ सुर्की नारळें, सुपारीचीं झाडें ४०, भोईचां- फियाचीं ५, सुरंगाच्या बिया २०, येणेंप्रमाणें प्रविष्ट जालें. सेवेसी श्रुत असावें. विशेष. बैलांची आज्ञा केली, त्यास यत्न केला, परंतु अनुकूल न जालें. त्यास हैसी निंबाजीनें किल्यामध्ये जाऊन आपले पारखीनें सु- मारें २ दोन घेतल्या त्या सेवेसी पाठविल्या असेत. सदैव लोभ करून पत्रद्वारें आज्ञा करीत असले पाहिजे. दया अभिवृद्धीतें पावीजे. कि- त्येक अर्थ स्वमुखें मशारनिल्हे सांगतां उपश्रुत होईल. व सकलादेची आज्ञा जाली, त्यास औरंगाबादेस मनुष्यें पाठविली आहेत; आल्यावरी पाठवून देऊं. कदाचित् उपयोगा न आलीं तरी पुढें सेवेसी पाठवून देऊं. बहुत काय लिहिणें दया अभिवृद्धीतें पावीजे हे विज्ञापना. [ लेखांक १७४ ] श्री. श्रीमत् परमहंस भार्गवबावा स्वामींचे सेवेसी:- आज्ञाधारक मल्हारजी होळकर कृतानेक दंडवत विनंति. ये- थील कुशल आश्विन वद्य १४ प्रताप स्वामींचा जाणून स्वकीय लि- हीत आज्ञा केली पाहिजे. विशेष स्वामींनीं रा० गोविंद केशव नेने यांजबराबर प्रसाद फणसपोळी व आज्ञापत्र पाठविलें तें पावोन बहुत संतोष जाहला. तो पत्रीं कोठवर लिहावा ? पत्रांत आज्ञा कीं श्रीचे रुपये ३०० तीनशें राहिले आहेत ते पाठवून देणें. त्याजवरून तीनशें रुपये मशारनिल्हेसमागमें पाठविले आहेत. सेवेसी पावलीयावर सेव कास आशीर्वादपत्र पाठविले पाहिजे. आह्नीं याजउपरी श्रीच्या आ शीर्वादाचें स्मरण करून माळवेप्रांती मजल दर मजल जाऊं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १७५] ● श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसीः- चरणरज मल्हारजी - - होळकर कृतानेक दंडवत विज्ञापना येथील