पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८३ वोढीचा जाला, त्याजमुळें स्वामींचे सेवेसी वर्ष दोन वर्षे अंतर पडलें, याकरितां विषादास न यावें. स्वामींनीं आशीर्वाद देऊन, आमचें कल्याण होऊन कर्जाचा परिहार होय तो अर्थ करावा. पूर्वीपासून स्वामींची कृपा आझांवर आहे त्यापेक्षां विशेष जालियानेंच आमचें कल्याण आहे; आणि सेवेसी अंतर होणार नाहीं. स्वामींचे सेवेसी कु- डती एक व टोपी एक पाठविली आहे. प्रविष्ट होय. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १७२] श्री. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य स्वामींचे सेवेसी: आज्ञाधारक मल्हारजी होळकर कृतानेक दंडवत विज्ञापना ये- थील कुशल आषाढ कृष्ण ७ सप्तमी भानुवासर स्वामींच्या प्रतापें यथास्थित असे विशेष कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें, मस्तकीं वंदोन चित्तास परम संतोष जाला. यानंतर सेवेसी रामचंद्र महादेव यांसमागमें रुपये ७०० सातरों व सकलाद हिरवी एक ऐसें पाठविलें आहे. विदित असावें. कृपेची अभिवृद्धि अहिर्निशीं करून सेवकाचें विशेष ऊर्जित होय ऐसें केलें पाहिजे. सदैव पत्र पाठवून जे आज्ञा क र्तव्य ते करीत गेर्ले पाहिजे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. श्री. [ लेखांक १७३] तीर्थस्वरूप राजश्री बावा स्वामींचें सेवेसी:- आज्ञाधारक मल्हारजी होळकर कृतानेक साष्टांग दंडवत विज्ञापना. येथील कुशल भाद्रपद कृष्ण १ प्रतिपदा स्वामींच्या प्रतापें यथास्थित असे. कृपावंत होऊन आशीर्वादपत्र पाठविलें (तें) प्रविष्ट होऊन मस्तकीं अभिवंदोन चित्त उल्हासयुक्त जालें. ऐसीयासी प्रसाद वेदमूर्ति रा० वासुदेवभट व निंबाजी हवालदार यांजसमागमें येणेंप्रमाणें विस्तारें; १ आषाढ कृष्ण ७ भानुवासरः - ता० ३ जुलई इ० स० १७४३. - -