पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ सुखरूप असों विशेष रा० केसोपंताइस्तें आशीर्वादपत्र व प्रसाद पाठविला तो पावून बहुत संतोष जाला. पत्रीं आशा लिहिली कीं, तीन सहस्र रुपये पाठवणे ह्मणून आज्ञा केली, त्यास यंदाचा प्रसंग वोढीचा जाला. याजकरितां प्रस्तुत रा० केसो गोविंद यांजबराबर रुपये २००० दोन हजार पाठविले आहेत. ते घ्यावे. वस्त्रांविशीं आज्ञा लिहिली त्यास आपणायोग्य वस्त्रें जामदारखान्यांत नव्हतीं. याजकरितां त्यांतच शोधून वस्त्रे दोन ताडपत्री शेवती पैकीं १ व मह- मुदी १ पाठविली आहे, ते मान्य करावी. याउपरी यंदा कर्जा- विशीं फारसी वोढ जाली. परिहार करणार स्वामी समर्थ आहेत; याज- करितां आपणास चिंता वाटत नाहीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [लेखांक १७१] श्री. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामींचे सेवेसीः— चरणरज मल्हारजी होळकर कृतानेक विज्ञापना येथील क्षेम ता० भाद्रपद वद्य तृतीया भृगुवासर जाणून स्वामींचे आशीर्वा- देकरून वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामींनीं पत्र पाठविलें तें उत्तम समय पावोन परम समाधान जाहलें. ऐसेंच सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करीत असले पाहिजे. यानंतर आझांकडील सविस्तर वर्तमान तर आज दोन वर्षे मुलुखगिरी जाहली; कोठून पैसा मिळकत नाहीं; कर्जवाम खात प्रसंग तो चालवावा लागला; दो वर्षीही ठिकाणीं आलों. रा० वासुदेव काशीविश आपण पत्र कितीयेक विचारें लेख केला, त्यास मशारनिल्हे तो गुदस्ता समजाविशी जाइलेनंतर येऊन पों- हचले. तदनंतर सर्व मजकूर कर्जवाम करीतच चालावें लागले; या करितां अनुकूळ न जाहलें. तर, हल्लीं समजाविशीच्या प्रसंगी ज्या- प्रमाणे दरसाल मागें देत आलों त्याप्रमाणे प्रविष्ट करूं. वरकड कि त्येक गोष्टी मशारनिल्हेनीं विदित केल्याच असतील. आमचा प्रसंग १ भाद्रपद वद्य तृतीया भृगुवासरः ता० २९ आगस्ट ३० स० १७४०. -