पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८१ मींनीं आशीर्वादपत्र पाठविले पावलें. आज्ञा केली कीं, अद्याप दर्श- नास येत नाहीं. ऐसीयास आपले पायांसी आह्मांपासून अंतर न पडावें हें उचित, परंतु किंचित् दिवसांचे अवकाश विजयादशमी जाहलियास खामखा सेवेसी येतों. अंतर किमपि होणार नाहीं. अवधाच विचार स्वामींचे पायांपासीं निवेदन होईल. आझी स्वामींचे आशीर्वादाचे स्थापित आहों. अंतराय स्वामींशीं कदापि करणार नाहीं. प्रस्तुत अंतर जाहलें हा अर्थ स्वामी जाणतच आहेत. आह्मीं सेवेसी लिहा- वेंसें काय आहे ? सेवेसी कळावें याजकरितां लेखन केले आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. [ लेखांक १६९] श्री. श्रीमत् परमहंस भार्गवराम स्वामींचे सेवेसी:- [लेखांक १७० ] - सेवक रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा कृतानेक विज्ञापना येथील कुशल जाणून स्वकीय लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष कृपा करून खंडोजीबरोबरी पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत होऊन संतोष जाहला. वरातेच्या ताकिदीविषयीं लिहिलें त्याजवरून बाळापूरचे कमाविसदारांस ताकीदपत्रे व जासूद जोडी पाठविली आहे. तुझीं आपलीं मनुष्यें देऊन ऐवज आणविला पाहिजे. जबानीं खंडोजी सांगतां कळों येईल. रवाना छ० ११ माहे सफर, बहुत काय लिहिणें, लोभ असूं देणें हे विनंति. २ होळकर. श्री. श्रीमत् परमहंस स्वामींचे सेवेसी:- - - - चरणरज मल्हारजी होळकर कृतानेक साष्टांग दंडवत विज्ञप्ति ये- थील कुशल ता० भाद्रपद वद्य ५ इंदुवारपर्यंत स्वामींचे कृपेंकरून १ मल्हारजी होळकर:- सुभेदार थोरले मल्हारराव होळकर-कारकीर्द ३० स० १७३१-१७६५. २ भाद्रपद वद्य ५ इंदुवारः ता० १७ सप्तंबर इ० स० १७३३.