पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लिहून घेऊन मुख्य पत्र भोगवटियास देणे. जाणिजे बहुत काय लिहिणं.” (मोर्तब ) ह्या आज्ञापत्रांत हवशाकडून मिळालेल्या पेढें व आंवडस ह्या गांवांचा उल्लेख नसणें साहजिक आहे. कारण, तेथें मराठ्यांचा अंमल नव्हता. ह्या आज्ञा- पत्राच्या सालापासून म्हणजे ३० स० १७२६ पासून स्वामींच्या अस्सल कागद- पत्रांनीं सिद्ध झालेल्या चरित्रास सुरुवात होते. स्वामींनी शाहु महाराजां- कडून मिळालेल्या धावडशी, अनेवाडी आणि वीरमाडे ह्या तिन्ही गांवीं अनु- क्रमें त्या गांवचेच रहिवासी बाळाजी हरि अंतुरकर, जानो महादेव जोशी आणि हरि टिळक असे तीन इसम देखरेख करण्याकरितां ठेविले. स्वामींचे कोंकणांतील कारकून अद्यापि देशावर आले नव्हते असे दिसून येतें. ह्यावरून - इ० स० १७२६ नंतर हबशी सिद्दी सात ह्याचा व स्वामींचा हत्तीच्या कारणामुळे तंटा उत्पन्न झाला व त्यामुळे स्वामींस कोंकणप्रांत त्याग करून देशावर येणे भाग पडलें. ती हकीकत येणेप्रमाणे:- सिद्दी याकूदखान ह्याचा अंजनवेल ऊर्फ गोवळकोट येथील सुभेदार सिद्दी सात ह्यास सावनूर बंका- पूर येथील पठाणाने एक हत्ती बक्षीस दिला होता. परंतु तो परराज्यांतून सुरक्षितपणे अंजनवेलीस आणतां येईना. कारण, बंकापुराहून अंजनवेलपर्यंत मराठ्यांच्या चौक्या जागजागी असल्यामुळे त्यांच्या तडाक्यांतून मुसलमान पठाणाचा हत्ती सुटून येणें त्या वेळच्या स्थितीप्रमाणे अशक्य होते. तेव्हां हबशी सिद्दी सात ह्यानें अशी युक्ति योजिली कीं, ब्रह्मंद्रस्वामी ह्यांचे मराठी राज्यांत चांगलें वजन आहे व त्यांच्या शब्दाचा कोणी अनादर करणार नाहीं, त्या अर्थी त्यांस विनंति करून त्यांच्याकडूनच हत्ती आणविण्याची कांहीं तजवीज करावी. त्याप्रमाणे त्यानें स्वामींस पत्र पाठविले कीं, “आपली आज्ञा सर्व राज्यांत मान्य आहे. यास्तव वरघाटें आपा जोशी पाठवून पंतप्रधान व पंत प्रतिनिधि यांचीं दस्तकें आणवून द्यावीं.” स्वामींनी उत्तर पाठविलें कीं, “आह्मांस भि- क्षार्थ सावनूर प्रांत जाणेच आहे. तुमचे काय हत्ती असतील ते आमच्या समागमें येतील. कोणाच्या दस्तकाचें प्रयोजन नाहीं.” ह्याप्रमाणे स्वामींनीं उत्तर पाठविल्यानंतर सिद्दी सात ह्यानें स्वामींच्या बरोबर हत्ती आणण्याकरितां मंडळीस +' लोक पाठवून दिले.