पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० बाबत रुपये तीन हजार, आझी तिकडे गेलों असतों तरी सदरहू रुपये घेऊन जाजतीही घेतले असते ह्मणोन आज्ञा लिहिली, विस पंतमशारनिल्हेस दोनचार वेळ लिहिले आहे. ते रुपये पाठवून देतील. न देतील तर त्यासच द्विगुण द्यावी लागेल. वरकड मज- कूर पाचांविसीं लिहिलें तरी तलाश करून पाठवून देऊं. शिंदे यांचे रुपयांविसीं लिहिलें तरी त्यांस ताकीद करून देवितों स्वामींच्या कार्यास आपणाजवळून अंतर होणार नाहीं. विशेष लिहावें तर आपण स्वामींचा सेवक असें. आपणाविरहित गोष्ट दुसरी आहे ऐसें नाहीं. श्रुत जाहले पाहिजे हे विनंति. [लेखांक १६७] श्री. श्रीमंत परमहंस भार्गवरामबावा स्वामींचे सेवेसीः- सेवक रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल जाणोन स्वानंद लेखन आज्ञा केली पाहिजे विशेष. आपण राजश्री रामाजी गणेश यांसमाग में पत्र पाठविलें तेथें लिहिलें, पाचा आठ, दर तेराप्रमाणे, पाठवणें त्याजवरून पाचांचा तलास कर- विला आहे. आल्यानंतर सेवेसी पोहोंचतील. यानंतर पवारांचे बो लीविसीं लिहिलें, त्यास मशारनिल्हेचे मारफतीनें बोली केली आहे. हे सेवेसी निवेदन करितील, त्याजवरून विदित होईल तीन हजार रुपयांविषय राजश्री भास्कर राम यांस लिहिले आहे. नारायण तेल आपण पाठविलें तें पावलें. सेवेसी विदित जाहले पाहिजे. विशेष काय लिहिणें, कृपावृद्धि केली पाहिजे, हे विनंति. [ लेखांक १६८] श्री. - श्रीमत् परमहंस स्वामीः— सेवेसी रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा कृतानेक दंडवत विनंति येथील कुशल स्वामींचे कृपॅकडून आजिपर्यंत यथास्थित असे. स्वा -